Type to search

आवर्जून वाचाच देश विदेश मुख्य बातम्या

#MeToo: अकबर यांनी बलात्कार केला, पत्रकार महिलेचा आरोप

Share

नवी दिल्ली : #MeToo प्रकरणात केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेल्या एम. जे. अकबर यांच्यावर एका महिला पत्रकाराने बलात्काराचा आरोप केला आहे. २३ वर्षांपूर्वी अकबर यांनी आपल्यावर बलात्कार केला होता, असा आरोप अमेरिकेत राहणाऱ्या पत्रकार पल्लवी गोगोई यांनी केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

मी टू’ मोहिमेत अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडली होती. यात एम. जे. अकबर यांच्यावरही आरोप झाले होते. एम. जे. अकबर एका इंग्रजी वृत्तपत्राचे संपादक असताना नोकरी देण्यासाठी घेतलेल्या मुलाखतीवळी अकबर यांनी कसा लैंगिक छळ केला याची माहिती सर्वप्रथम प्रिया रमाणी यांनी दिली होती. यानंतर आणखी महिलांनी एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते. या आरोपांमुळे एम. जे. अकबर यांना परराष्ट्र राज्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

‘एक मॅगझिन लॉन्च करण्यासाठी अकबर यांनी मुंबईत बोलावले होते. त्यावेळीही एका हॉटेलात त्यांनी मला किस करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मी त्यांना धक्का देऊन रडतच बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी मला कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली होती. तसेच पल्लवी यांनी यावेळी दुसऱ्या एका घटनेचाही उल्लेख केला. ‘जयपूरमध्ये एका हॉटेलात अकबर आणि मी एका बातमीवर चर्चा करत होतो. त्यावेळी अकबर यांनी माझ्यावर बलात्कार केला,असं पल्लवी यांनी म्हटलं आहे. ‘दोन आठवड्यांपूर्वीच अकबर यांनी परराष्ट्र राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!