Type to search

Featured हिट-चाट

रणवीर सिंहसोबत ‘सेट’ आकाश ठोसर

Share

मुंबई : अभिनयाची पार्श्वभूमी नसलेला आकाश ठोसर सैराट सिनेमातून जगभरात पोहोचला आणि लोकप्रिय ठरला. परश्याची भूमिका साकारून आकाश ठोसरने सिनेक्षेत्रात आपली जागा निर्माण केली. मसैराटफ नंतर आकाश ठोसर अनेक छोट्या छोट्या गोष्टी करताना दिसला. एफयू सिनेमा लस्ट स्टोरी वेबसिरीज या दोन गोष्टींनंतर आता आकाश जाहिरातीमध्ये देखील झळकला आहे. बॉलिवूडचा बाजीराव ठरलेला अभिनेता रणवीर सिंहसोबत आकाश ठोसरने स्क्रिन शेअर केली आहे.

सेट-वेटच्या जाहिरातीमध्ये आकाश आणि रणवीर सिंह एकत्र दिसले आहेत. आकाश ठोसरची गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या लूकमुळे चर्चा आहे. आकाश ठोसरने मसैराटफ सिनेमात गावरान मुलाची भूमिका साकारली होती. पण त्यानंतर त्याच्यामध्ये झालेला बदल हा लक्षवेधी ठरला. आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू या दोघांनी अभिनयाची पार्श्वभूमी नसताना स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. पहिल्या सिनेमानंतर या दोघांची वेगवेगळी काम सुरूच आहेत. असं असताना आकाश ठोसरने बॉलिवूडचा लक्षवेधी अभिनेता रणवीर सिंहसोबत काम केलं आहे.

 

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!