Type to search

आवर्जून वाचाच मुख्य बातम्या हिट-चाट

दीपिकासोबत या तारखेला होणार लग्न; रणवीरची ट्विटरवर घोषणा

Share

मुंबई: बॉलिवूडची चर्चेत असलेली जोडी रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण यांच्या विवाहाच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत त्यांचे लग्‍न होणार असल्याची चर्चा होती. या चर्चेला दीपिकाने पुर्णविराम लग्नाची पत्रिका सोशल मिडीयावर शेअर करून दिली आहे. तसेच रणवीरने ट्विटरच्या माध्यमातून लग्नाची घोषणा केली आहे. येत्या १४ आणि १५ नोव्हेंबरला हा विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती रणवीरने ट्विटरवर दिली आहे.

तुम्हाला कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की कुटुंबीयांच्या आशीर्वादाने १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी आमचं लग्न ठरलं आहे. इतक्या वर्षांत तुम्ही आम्हाला जे प्रेम दिलं त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. प्रेम, मैत्री आणि विश्वासाच्या आधारावर आमचा जो पुढील प्रवास सुरू होणार आहे त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.. दीपिका आणि रणवीर,’ अशी पोस्ट रणवीरने ट्विटरवर लिहिली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!