Type to search

Featured आवर्जून वाचाच मुख्य बातम्या सार्वमत

नगर: रांगोळीतून दिला सामाजिक संदेश

Share

अहमदनगर (प्रतिनिधी)- मानाच्या विशाल गणपतीची रामचंद्र खुंट येथे आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. मानाच्या विशाल गणपतीच्या विसर्जन मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. यातून निसर्ग संवर्धन, सामाजिक एकात्मता, बेटी बचाव, बेटी पढाओ, असे सामाजिक संदेश दिले होते. गणेशभक्तांना या रांगोळ्याच्या पायघड्या मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. मानाच्या विशाल गणपतीची विसर्जन मिरवणूक वेगाने पुढे निघाली असून, सायंकाळी सव्वाचार वाजता चितळे रोडवर पोहचली होती. दिल्ली गेट येथे सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही मिरवणूक पोहोचेल, असे मिरवणुकीबरोबर असलेल्या विश्वस्तांनी सांगितले. विसर्जन मिरवणूक जशी पुढे सरकत होती, तसा जल्लोष होत होता. मिरवणुकीवर पुष्पांचा वर्षाव गेला जात होता. प्रसाद वाटला जात होता. नवसपूर्ती केली जात होती. बाप्पाला, पुढच्या वर्षी लवकर या असे साकडं गणेशभक्त घालत होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!