येत्या जूनमध्ये रणबीर कपूर व आलिया भट्ट करणार साखरपुडा?

0
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर – आलिया भट्ट लवकरच साखरपुडा करून त्यांच्या नात्याला नाव देणार असल्याचं म्हटलं जात आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कपूर कुटुंबातील चौथी पिढी अभिनेता रणबीर लोकप्रिय निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या मुलीशी आलियाशी लग्न करणार आहे.

गेल्या वर्षापासून हे दोघं एकमेकांना डेट करत असून यावर्षी 2019 मध्ये जून महिन्यात साखरपुडा करत असल्याच्या चर्चा समोर आल्या आहेत. नुकतेच दोघं पण न्यूयॉर्कमध्ये नवीन वर्ष साजरं करून परतले आहेत. यावेळी तिच्यासोबत ऋषी कपूर, नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर, भरत साहनी आणि मुलगी समारा म्हणजे ऋषी कपूर यांच संपूर्ण कुटुंब होतं.

सध्या आलिया व रणबीर ‘ब्रह्मास्त्र’च्या शूटींगमध्ये बिझी आहे आणि ‘ब्रह्मास्त्र’ रिलीज होण्यापूर्वी दोघेही साखरपुडा करणार, असे मानले जात आहे.  खुद्द रणबीरची आई नीतू कपूर यांची तशी इच्छा आहे. ‘ब्रह्मास्त्र’ येत्या आॅगस्टमध्ये प्रदर्शित होत आहे त्यापूर्वी या दोघांनी साखरपुडा करावा अशी नीतू यांच्यासह अख्ख्या कपूर कुटुंबीयांची इच्छा आहे. भट्ट कुटुंबाचीही हीच इच्छा आहे. कुटुंबाच्या इच्छेखातर रणबीर आणि आलिया येत्या जूनमध्ये एन्गेज्ड होतील, असे कळतेय.

LEAVE A REPLY

*