‘ईद मुबारक’ संदेश देखील झाले ‘हायटेक’

0
जुने नाशिक । मागील काही वर्षात जगात झपाट्याने बदल झाले. माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे ‘सोशल मिडिया’ अत्यंत प्रभावशाली बनला.

या काळात विविध क्षेत्रात कमालीचे बदल झाले तर पारंपारीक पध्दतीने साजरा होणारे सणउत्सव देखील आता ‘हायटेक’ पध्दतीने साजरा होत आहे. त्यात ईद म्हणजे आनंदोत्सव साजरा करण्याचा व एकमेकांशी भेटून जवळ येण्याचा दिवस असतो. मात्र सध्या धावपळीच्या जिवनात ‘सोशल मिडिया’ शुभेच्छा देण्याचा माध्यम बनला आहे.

ईदच्या दिवशी लोक एकमेकांच्या घरी जायचे, मोठ्यांना सलाम करुन आशीर्वाद घ्यायचे. तर बाहेरगावी असणार्‍यांना ईद मुबारकचा संदेश पाठविण्यासाठी पोस्टाचा आधार घ्यायचे.

मात्र आता एका ‘क्लीक’ वर सोशल मिडियाव्दारे संदेश जगाच्या कोणत्याही कोपर्‍यात पोहोचता, या बदलत्या ‘ट्रेन्झ’ मध्ये ज्येष्ठ नागरीक स्वताला बदल करुन घेत आहे. तर काही लोक या फक्त ‘औपचारीक’ म्हणत आहे.

इस्लाम धर्मात सणांना विशेष धार्मीक महत्व आहे. सणांच्या शुभेच्छा एकमेकांना देणे हे एक प्रकारे पुण्य काम मानला जातो. पुर्वीपासून मुस्लिम बांधव विविध सणांच्या शुभेच्छा एकमेकांना देतात. यामध्ये ‘ईद-उल-फित्र’ या मोठ्या सणात शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येतो.

मागील काही वर्षात यामध्ये मोठे बदल घडले आहे. अगदी 10 वर्षापुर्वी पोस्टाच्या कार्डवर किंवा शुभेच्छा कार्ड घेऊन तो पोस्टाव्दारे नातेवाईक, मित्रांना पाठवण्याची परंपरा होती. त्यात बदल होतांना टेलिफोनचा जमाना आला, त्यामुळे थेट फोन करुन शुभेच्छा देण्यास प्रारंभ झाल्याने कार्ड पध्दत कमी झाली.

तर आता सोशल मिडियामुळे शुभेच्छा देणे आणखी सोपे झाले. या बदलत्या जमान्यात लोक देखील स्वताला बदल करुन घेत आहे. तरी पुर्वी सारखी मजा येत नसल्याचे ज्येष्ठ नागरीक सांगतात.

LEAVE A REPLY

*