बलात्कारातील दोषी राम रहिमच्या समर्थकांचा चार राज्यात धुडगूस; जाळपोळ, गोळीबार, दगडफेक; १७ ठार

0

डेरा सच्चाचा स्वयंघोषित गुरू आणि न्यायालयाने बलात्कारात दोषी ठरविलेल्या राम रहिम याच्या अटकेनंतर त्याचे समर्थक हिंसक झाले असून हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांमध्ये हिंसाचार उसळला आहे.

सुरवातीला पंचकुला येथे कोर्टाबाहेर माध्यमांच्या ओबी व्हॅन जाळून नंतर माध्यम कर्मचारी व पत्रकारांवरही डेरो समर्थकांनी हल्ला केला. त्यानंतर अनेक ठिकाणी या समर्थकांनी गोळीबार केला, दुकानांना आणि बसेसला आगी लावल्या तर रेल्वे स्थानकही पेटविण्यात आले.

आतापर्यत डेराच्या एक हजार समर्थकांना अटक करण्यात आली आहेत.  तर १७ जणांना मृत्यू झाला आहे. डेराच्या राम रहिमला आता हेलिकॉप्टरने रोहतक येथे आणून त्यानंतर लष्करी तळावरून त्याला तुरुंगात धाडण्यात येणार आहे.

डेरा समर्थकांच्या हिंसेत १७ सात लोकांचा मृत्यू झाला आहे. तर डेराचे मुख्यालय असलेल्या सिरसा येथे समर्थकांना काबूत आणण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला आहे. तर काही ठिकाणी पोलिसांनाही जमावापुढे पळ काढावा लागला आहे. शिरसामधील स्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.

जाट आंदोलनानंतर सरकारची हे दुसरे अपयश मानण्यात येत आहे.

पंचकुला येथील एक  हॉटेल पेटविण्यात आले आहे. चंडीगढमध्ये संचारबंदी लावण्यात आले आहे.

विशेष म्हणजे निकालाची सुनावणी सुरू होण्यापूर्वी पंचकुला येथे एक लाख डेरा समर्थक जमले होते. त्यापैकी कोर्टाबाहेर ५ ते ७ हजार जणांचा जमाब आक्रमक झाला होता.

मात्र तरीही पोलिसांनी काहीच भूमिका घेतली नाही. यासंदर्भात न्यायालयाने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढूनही उपयोग झाला नाही आणि हिंसाचार भडकला असे सांगितले जातेय.

उत्तरप्रदेशमध्येही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. डेरा समर्थकांनी रेल्वे स्टेशनवरही हल्ला चढविला असून मलोट आणि बलुआन रेल्वे स्टेशन जाळून टाकले आहे.

त्यामुळे पंजाबमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या ३५० रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

बलात्कार प्रकरणी दोषी ठरवून डेरा सच्चाच्या राम रहिम याला अटक केल्यानंतर त्याच्या समर्थकांनी न्यायालयाबाहेर गोंधळ घातला.

जमाव हिंसक होत असल्याचे पाहून पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले. जमावाने वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यमांच्या वाहनांवरही दगडफेक केली आहे.

स्वयंघोषित अध्यात्किम गुरू राम रहिमने २००२ मध्ये दोन स्त्रियांवर अत्याचार केला होता. त्याप्रकरणी त्याला आज सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरविले.

हजारो कोटींची संपत्ती आणि लाखो अनुयायी असलेल्या डेरा सच्चा हा प्रमुख अतिशय ऐषोआरामात आणि विलासी जीवन जगत होता.

आजही कोर्टात येण्यासाठी त्याने १०० वाहनांचा ताफा सोबत ठेवला होता.

मी म्हणेल ती पूर्वदिशा असा अहंकार असलेला हा बाबा कोर्टासमोर मात्र हात जोडून सोडून देण्यासाठी विनंती करताना दिसला.

त्याने आतापर्यंत ओएमजी नावाने दोन चित्रपटांची निर्मिती केली असून त्यात तो स्वत:च नायकाच्या भूमिकेत आहे.

LEAVE A REPLY

*