नगरमध्ये विनापरवानगी मिरवणूक, पाचजणांविरोधात गुन्हा दाखल

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – रामनवमीनिमित्त शहरातून शनिवारी सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत हिंदू राष्ट्र संघटना आणि श्रीराम जन्मोत्सव समिती या दोन संघटना सहभागी झाल्या होत्या. मात्र, शहरात जमावबंदी असताना विनापरवानगी मिरवणूक काढल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात पाच जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी हिंदू राष्ट्र संघटनेने माळीवाडा बसस्थानकाशेजारील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणूक काढली होती. मात्र, शहरात जिल्हाधिकार्‍यांनी जमाव बंदी केलेली आहे. असे असताना मिरवणूक काढल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी सचिन गोरे यांच्या तक्रारीवरून दिगंबर गेंट्याल, परेश खराडे, शुभम कोमकुल, निखील धांगेकर, सनी परदेशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*