रामनाथ कोविंद देशाचे १४ वे राष्ट्रपती

0

नवी दिल्ली: रामनाथ कोविंद  भारताचे १४ वे राष्ट्रपती बनले असून येत्या २५ जुलैला ते पद आणि गोपनियतेची शपथ घेतील.

राम नाथ कोविद हे ६५.६ टक्के मते मिळवून राष्ट्रपती निवडणूक विजयी झाले.

आपण राष्ट्रपतीपदी निवडून येऊ असा कधी विचार केला नव्हता. ए.पी जे. अब्दुल कलम आणि प्रणव मुखर्जी यांची परंपरा आपण सुरु ठेवणार आहोत. देशासाठी अथक सेवाभाव मला येथपर्यंत घेऊन आला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली  म्हणाले.

मुळचे कानपूर, उत्तर प्रदेश येथील रामनाथ कोविंद हे भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा सदस्य होते. १९९१ मध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर १९९४मध्ये उत्तरप्रदेश मधून राज्यसभेवर निवडून गेले.

त्यानंतर भाजपा तर्फे सलग १२ वर्षे ते राज्यसभेचे खासदार राहिले. सध्या ते बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या दलित मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि अखिल भारतीय कोळी समाजाचे ते अध्यक्ष होते.

१ ऑक्टोबर १९४५चा जन्म असलेले कोविंद हे वकीलीचे पदवीधर असून १९७७ ते १९७९ पर्यंत त्यांनी दिल्ली हायकोर्टात केंद्रसरकारचे वकील म्हणून काम पाहिले.

राष्ट्रपतीपदासाठी मीराकुमार त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार होत्या.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनियुक्त राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे अभिनंदन केले.

 

राम नाथ कोविंद यांच्या मुळगांवी उत्सवी वातावरण

LEAVE A REPLY

*