Type to search

ब्लॉग सार्वमत

रमजानसाठी 70 प्रकारचे खजूर बाजारात दाखल

Share
रमजानच्या उपवासानिमित्त उपलब्ध माहितीनुसार भारतील बाजारपेठेत 70 प्रकारचे खजूर दाखल झाले आहेत. परदेशातून मोठ्या प्रमाणावर खजूर विक्रीस आलेले आहेत. इराण, इराक, सौदी परदेशातून खजूर विक्रीस भारतात येत असतात. या खजूरमध्ये अजवा, कलमी, मदिना, मगजोल, फरत, सुलतान, केमिया, रुकसार, हसना, हार्मोनियम, मुज्जरब, बुरारी, गुड, अल्जेरियन असे अनेक प्रकारचे खजूर विक्रीस उपलब्ध आहेत.

मुस्लीम समाज उपवास सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहक खजूरची खरेदी करीत असतात. यामध्ये सर्वात जास्त मदिना या खजूराला मागणी असते. ताई सर्वात महागडा मगजोल हा खजूर बाजारपेठेत उपलब्ध आहे. मुस्लिम बांधव सायंकाळी उपवास सोडण्यासाठी प्रथम खजूर खाऊन उपवास सोडतात. त्यामुळे रमजानच्या महिन्यात खजूरला महत्व आहे. कारण दिवसभर उपवास असतो त्यामुळे शरिरात खजूर खाल्ल्याने रक्त वाढ होते. तसेच व्हिटमन्ससुध्दा मिळते. कलमी, फरद या इराणी खजुरला जास्त ग्राहकांची मागणी असते.

खरजूमध्ये ग्लुकोज आणि फळांमधील साखर याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे आरोग्यवर्धक टॉनिक मिळण्यास मदत होते. मधुमेह (डायबेटीस) लोकांसाठी खजूर चांगले. खजूरमध्ये 23 कॅलरीज मिळतात. तसेच खजूरमध्ये कोलेस्ट्रोल नसतात. तसेच कर्करोग (कॅन्सर), हृदय रोगांसाठी खजूर एक वरदान आहे. खजूरमुळे तात्काळ ताकद मिळते, खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात आरोग्यवर्धक मात्रा असतात. ग्लुकोज, फळातील साखर प्रमाण असते. त्यामुळे खजूर खाण्यामुळे याचा शरीराला लाभ होतो. दोन ते चार खजूर खाल्ले तर आपल्याला एनर्जी मिळते, वजन वाढविण्यास मदत होते.

वजन वाढत नसेल तर तुमची देहएष्टी किरकोळ असेल तर वजन वाढविण्यासाठी खजूर मदत करतो. व्हिटॅमिन आणि प्रोटीन (प्रथिने) जास्त असतात. त्यामुळे वजन वाढण्यासाठी याची मदत होते. बारीक असणार्‍या व्यक्तींनी रोज 4 ते 5 खजूर खाण्यास सुरुवात केली तर वजन वाढेल, हाडे मजबूत होण्यास मदत खजूर खाण्यामुळे तुमची हाडे मजबूत होण्यास मदत होते. कारण खजूरमध्ये लोह, खनिज, कॉपर, सेलेनियम यांची अधिक मात्रा असते. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते.

ज्यांना अपचचा त्रास आहे. तसेच कपचा त्रास असेल तर यातून सुटका मिळते. फायबर्सचे प्रमाण खजूरमध्ये जास्त असते. त्यामुळे पचन होण्यास अधिक मदत होते. रात्री चार खजूर रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठल्यावर खा. काही दिवसात याचा फायदा लक्षात येईल. खजूर त्वचेसाठी खूप चांगले आहे. खजूर खाण्यामुळे चेहर्‍याला तेजी येते. चेहर्‍यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. त्वचा अधिक उजळ होण्यास मदत होते. उत्साहवर्धक खजूर अत्यंत गोड चवीचे पौष्टिक खजूर सर्वांना परिचित असलेलं फळ आहे. उत्तर आफ्रिका, सिरिया, अरबस्तान येथे खजूर भरपूर प्रमाणात मिळतो. खजुराच्या कच्च्या फळाला वाळल्यावर खारीक म्हणतात.

खजुरामध्ये प्रथिनं, काबरेद, खनिज द्रव्यं, कॅल्शिअम, फॉस्फरस आणि पोषक तत्त्वे असतात., खजुरात 85 टे साखरेचं प्रमाण असते. अत्यंत गोड, थंड, स्निग्ध आणि गुरू गुणाचा खजूर वात-पित्तशामक आहे. खजूर मेंदूची उत्तेजना थांबवून नाडीसंस्थेला बळ देतो. चक्कर येणं, भ्रम, मस्तिष्क, दौर्बल्य, पाठदुखी, कंबरदुखी या तक्रारीवर उपयुक्त आहे. अतिमद्यपानानंतर दुसर्‍या दिवशी येणार्‍या हँगओव्हरवर उपाय म्हणून खजूर खायला द्यावा. रक्तातील लोहाचं प्रमाण कमी झालं असता थकवा येणं, धाप लागणं, चक्कर येणं, भोवळ येणं, छातीत धडधड होणे अशावेळी खजूर खाल्ल्याने तक्रारी कमी होतात आणि हृदयाला बळ मिळतं.

खजुरात खोकला आणि कफनाशक गुणधर्म आहेत. लघवीची जळजळ, मूत्रमार्गात दाह होत असेल अशावेळी खजूर द्यावा. खूप काम केल्यानंतर थकवा आला असेल, मरगळ येऊन उत्साह कमी झाला असेल तर खजूर खाल्ल्यानं तत्काळ उत्साह येतो. या गुणांमुळे खजुराला सद्य संतर्पणफ खाद्यपदार्थ म्हणून ओळखतात. खेळाडू, तरुण, वृद्ध यांना दूध, साखर, काळे मनुके, मध, पिंपळी आणि खजूर खायला द्यावे. एखाद्या तरुण युवकाचा आवाज बारीक आणि बायकी वाटतो त्यालाही हे मिश्रण खूप उपयुक्त आहे.

पिवळट तपकिरी रंगाचे हे बोरासारखे तेवढेच लांबट फळ असते. एका फळात एकच बी असून तिच्या भोवतीच्या गरात 60 ते 70 टक्के साखर असते. झाडावर पिकलेल्या खजुराची गोडी वेगळीच असते. मात्र तो लवकर आंबू लागतो. म्हणून खजुराची फळे कडक उन्हात सुकवतात. खजूर सुकवताना त्याचे 35 टक्के वजन कमी होते. लागवडीस आणलेल्या प्राचीन फळांपैकी हे एक फळ आहे.

5000 वर्षापूर्वीच्या विटांवरील लिखाणात खजुराची लागवड

मेसापोटेमियात सापडलेल्या 5000 वर्षापूर्वीच्या विटांवरील लिखाणात खजुराची लागवड करण्याविषयीच्या सूचना सापडतात, तर इजिप्तमधील स्मारकांवर खजुरांच्या झाडांची चित्रे कोरलेली आहेत. बायबलमध्ये हे झाड व फळ यांचे गुण सांगणारे कित्येक उल्लेख आहेत. प्रेषित महंमद पैगंबर असे मानीत होते की, देवाने माणूस निर्माण केल्यावर उरलेल्या त्या खास मातीतून झाड निर्माण केले आहे. खजुराचे मूळ स्थान मेसापोटेमिया व पार्शियाचे आखात असावे, असे मानतात. आज जगातल्या प्रमुख पिकांत त्याची गणना होते. सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, स्पेन, इटली, चीन व अमेरिका आदी ठिकाणी याचे पीक घेतात.

– जी. एन. शेख (जहागीरदार)
    7276486026

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!