ईद मिलनचे आज आयोजन

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- रविवारी सायंकाळी चंद्र दर्शन झाल्याने सोमवारी (आज) मुस्लिम बांधव ईद सण साजरा करणार आहेत. 29 दिवसांपासून मुस्लिम बांधवांचा सुरू असणार रमजान पवित्र उपवास, प्रार्थनेची आज सकाळी नगर शहरातील ईदगाह मैदान इदूलफित्रची नमाज झाल्यानंतर सांगता होणार आहे. यासाठी पोलीस प्रशासानाने या परिसारातील वाहतूक अन्य मार्गाने वळवली आहे. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी 10 वाजता शहिरे खतीब मैलाना अहमदसौइद यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम बांधव नमाज पठण करणार आहेत. यासह शहरातील विविध मशीदमध्ये रमजानाच्या पवित्र नमाजचे आयोजन करण्यात आले आहे.29 दिवसांपूर्वी मुस्लिम बांधवाच्या पवित्र रमजान महिन्यांला सुरूवात झाली होती. यावेळी नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अबालवृध्दांसह लहान मुलांनी देखील उपवास (रोजा) धरला होता.
रविवारी सायंकाळी झालेल्या चंद्र दर्शनानंतर मुस्लिम बांधवांनी एकच आनंद व्यक्त करत एकमेंकांना शुभेच्छा देत सोमवारी ईदमिलन आयोजन करण्यात आले असल्याचे संदेश देत होते. सकाळी होणार्‍या नमाज नंतर मुस्लिम बांधवांच्यावतीने शिरखुरम्याचे आयोजन केले आहे. दरम्यान, रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील कोठला येथील ईदगाह मैदान नमाज पठण करण्यासाठी या भागातील पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी वळवली आहे.
सोमवारी सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत शहरातील पुण्याला जाण्यासाठी एसपी चौक, न्यायनगरमार्गे बेलेश्‍वर चौक, किल्ला चौक, चांदणी चौकाचा वापर करता येणार आहे. तर औरंगाबादला जाण्यासाठी जीपीओ चौक, किल्ला चौक, बेलेश्‍वर चौक, न्यायनगरमार्गे एसपी चौकाचा वापर करता येणार आहे. दरम्यान संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहाता, शिर्डी, नेवासा, शेवगावसह जिल्ह्यात हा सण साजरा होत आहे.

 

LEAVE A REPLY

*