सज्जनाचा ज्या कुळात अपमान होतो, त्या कुळाचा नाश होतो

0

महंत रामगिरी महाराज ; गवळी शिवरा सप्ताहाला भाविकांची अलोट गर्दी, आमटी भाकरी ठरतेय आकर्षण

गंगापुर (विशेष प्रतिनिधी)- सज्जानाचा ज्या कुळात अपमान होतो, त्या कुळाचा नाश होतो. सज्जानाचा अपमान करु नये, दुसर्‍याचा अपमान करणारा सुखी होवु शकत नाही. असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.
सदगुरु गंगागिरी महाराज 170 वा अखंड हरिनाम सप्ताह औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापुर तालुक्यातील श्री श्रेत्र गवळी शिवरा येथे 800 एकराच्या परिसरात संपन्न होत आहे.
काल शनिवार सप्ताहाच्या दुसर्‍या दिवशी प्रथम वाक्पुष्प गुंफतांना महंत रामगिरी महाराज बोलत होते. सुमारे दिड लाखाहुन अधिक भाविकांनी महंत रामगिरी महाराज यांच्या प्रवचनाला हजेरी लावली. हिरव्यागर्द माळरानावर भगव्या पतांकांनी, भाविकांनी सप्ताह स्थळ फुलून गेले आहे. महंत रामगिरी महाराज यांच्या मधुर वाणीतुन प्रवचनासाठी अलोट गर्दी काल पाहायला मिळाली.
सप्ताहस्थळावर प्रवचन रंगत आल्यावर मेघांनी गर्दी केली होती. काही क्षण पावसाच्या रुपाने या मेघांनी अलोट गर्दीवर थेंबरुपी पुष्पांचा वर्षाव केल्याचा अनुभवही भाविकांनी घेतला. काल विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते ना. धनंजय मुंडे, वैजापुरचे आमदार भाउसाहेब चिकटगावकर, माजी आमदार आर. एम. वाणी, बाभळेश्‍वरचे रावसाहेब म्हस्के, शिर्डीचे विजय कोते, संगमनेर कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, भास्करराव पानसरे, अस्तगावकर सराफचे अशोकराव बोर्‍हाडे, नवनाथ महाराज आंधळे, रमेश जवरे, बहिरट महाराज, रामनाथ निर्मळ, सचिन जगताप, चंद्रकात महाराज सावंत, सराला बेटाचे विश्‍वस्त मधु महाराज, विठ्ठलराव असावा, अक्षय बोर्‍हाडे, यांचेसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महंत रामगिरी महाराज यांनी गितेतील 9 व्या अध्यायातील 34 व्या श्‍लोकावर विवेचन केले. सप्ताह स्थळावरील देवी दाक्षयानी, हनुमान मंदिर, श्रीगणेश याबाबत महाराजांनी प्रवचनात उल्लेख करत त्यांचे महत्व भाविकांना सांगितले. देवी दाक्षयानि या शिवाच्या पत्नी सती आहेत. दक्ष कन्या म्हणुन दाक्षयाणि! दक्ष राजाचा विरोध असताने सतीचा विवाह शिवाशी झाला. शिवाच्या राहाणीमानावरुन दक्ष राजाला ते आवडत नव्हते. एकदा देवतांच्या सभेत शिव उभे न राहिल्याने दक्षाला राग येतो.
याचे वर्णन करतांना महाराज म्हणाले, अहंकारी मणुष्याला सन्मान मिळाला नाही तर तो क्रोधीत होतो. दक्ष अहंकारी होते. त्यांनी शिवाचा अपमान करण्याचे ठरवत, यज्ञ करण्याचे ठरवितो. शिवाला निमंत्रीत करत नाही. त्यामुळे सती ला राग येतो. त्यावर महाराज म्हणाले, जेथे प्रेम नसेल, तेथे निमंत्रण असले तरी जावु नये. पुढील प्रसंग भाविकांपुढे सांगत महाराजांनी सती स्वभस्म होते.
त्यावर विरभद्राचा जन्म, विरभद्र दक्षाचा शिरच्छेद करतो, शिवा केलेला यज्ञाचा विध्वंस, आणि पुन्हा दक्षाला बकर्‍याचे शिर लावुन पुन्हा उध्दार हा प्रसंग महाराजांनी भाविकांपुढे उभा केला. महाराज पुढे म्हणाले, सज्जानाचा अपमान करु नये, विभीषणा सारख्या सज्जानाचा अपमान रावणाने केला, रावणाचा नाश झाला. विदुराचा अपमानामुळे कौरवांची हाल झाली.
ज्ञानाभिमान असु नये, पुढच्या जन्मी तो पिशाच्च होतो. भगवंत कुणावरही अवकृपा करत नाही. दक्षाने शिवाची स्तुती केल्याने शिवाने त्याला बकर्‍याचा शिर बसविले. व उध्दार केला. शाप देण्याने उध्दारच होतो असे सांगत महाराजांनी पौराणिक दाखले देत त्याचे महत्व सांगितले. ते म्हणाले, श्रावण बाळाच्या माता पित्याने दशरथाला पुत्र वियोगाचा शाप दिला, पण दशरथाच्या घरी प्रत्यक्ष श्रीरामाच्या रुपाने भगवंताने जन्म घेतला. दक्षाला शिवाने ब्रम्हदृष्टी दिली.
हनुमानाचे महती सांगतांना रामगिरी महाराज म्हणाले, मनुष्य जन्मात निष्काम सेवा होत नाही, विविध चोचले यांचे वर्णन करत महाराज म्हणाले, हनुमानाने पाला खावुन रामाची निष्काम सेवा केली. काही जण म्हणतात ज्यांनी भक्ती केली त्यांना काय मिळाले? भक्ती कशासाठी? भगवंताला कुणी पाहिले का? असे प्रश्‍न उपस्थित होतात. त्यावर महाराज म्हणाले, हवा दिसत नाही, पण हवेचे भान होते.
आकाश दिसत नाही, पण त्याचे शब्दाद्वारे भान होते. परमात्म्याचे भानच होत नाही म्हणुन मानायचे नाही का? खरे तर मणुष्याच्या अंतकरणात अनेक प्रकारच्या वासना, विकार असतात. त्यामुळे शुध्द परमेश्‍वराला जाणण्याची अडचण होते. वासणेच्या आवरणामुळे हे दिसत नाही. त्यासाठी शुध्द अंतरकण असावे लागते. पुर्व जन्मीचे संस्कार, मनाचा बुध्दीवर होणारा परिणाम, प्रारब्ध, चिंतन जसे असेल तसे विचार येतात, यावर महाराजांनी भर देतात भाविकांना त्याचे महत्व सांगत उपदेशही केला.

शिर्डीला सप्ताहाची मागणी शिर्डीला सप्ताहाची मागणी  – शिर्डी येथे 171 वा सदगुरु गंगागिरी महाराज सप्ताह व्हावा, ना. राधाकृष्ण विखे पाटील, युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी व शिर्डी पंचक्रोशीतील  सर्व पक्षीय ग्रामस्थंांनी अशी मागणी साई निर्माण गृपचे अध्यक्ष विजय कोते, माजी उपनगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर गोंदकर, माजी सभापती राजेंद्र शिंदे, गणेशचे उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, शिर्डी सोसायटीचे माजी अध्यक्ष व गणेश कारखान्याचे संचालक मधुकर कोते, शिवप्रहार संघटना सचिन चौगुले, साई मिठास चे सर्वेसर्वा दत्ता कोते, शिर्डी नगर पंचायत चे गटनेते अशोकराव  गोंदकर  उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, अभय राजे शेळके,  छत्रपती शासन संघटनेचे  गणेश दिनकर कोते, सोसायटीचे माजी अध्यक्ष विनायक कोते, आपासाहेब कोते, अशोक खंडू कोते, भानुदास गोंदकर, अजित पारख, बाळासाहेब लुटे, संदिप पारख, नगर सेवक मंगेश त्रिभुवन, जमादारभाई, गफार पठाण, सलिम शेख, धनंजय साळी, संजय गोंदकर, गोकुळ ओस्तवाल, कमलाकर कोते, बाळासाहेब गांंडुळे,  नितीन उत्तमराव कोते, व शिर्डी ग्रामस्थंानी महाराजांकडे मागणी केली.  साई बाबा संस्थान अध्यक्ष हावरे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, माजी खासदार व ट्रस्टी भाउसाहेब वाकचौरे, प्रतापराव भोसले,व विश्‍वस्त मंडळ यांनी दिलेले पत्र महंत रामगिरी महाराज यांना दिले. 2018 मध्ये साईबाबांचे जन्मशताब्दी वर्ष, गंगागिरी महाराज व साईबाबा यांच्यातील जिव्हाळा यामुळे शिर्डी येथे पुढील वर्षीचा सप्ताह व्हावा, अशी शिर्डीकरांची अपेक्षा आहे. त्यावर महंत रामगिरी महाराजांनी गंगागिरी महाराज व साईबाबा जशी बुध्दी देतील तेथे सप्ताह होईल. असे अश्‍वासन त्यांना दिले. केलवड ग्रामस्थांनीही सप्ताहाची मागणी केली आहे. पिंप्रीनिर्मळ, तसेच अन्य गावांनी सप्ताह व्हावा, म्हणुन मागणी केली आहे.

…………………….

थोरात कारखान्याकडून यंत्रथोरात कारखान्याकडून यंत्र  संगमनेर येथील सहकार महर्षी भाउसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने या सप्ताहात महाप्रसादाची बुंन्धी सुकविण्यासाठी यंत्र या सप्ताहात दिले आहे. या शिवाय कढईतुन आमटी उपसुन ती टँकर मध्ये टाकण्यासाठी विजपंपाची व्यवस्था त्यांनी केली आहे. कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, भास्करराव पानसरे, सुरेश थोरात यावेळी उपस्थित होते.

…………………..

भगवंता प्रती निष्टेसाठी सप्ताह –

  भगवंताप्रती श्रध्दा, निष्ठा दृढ करण्याकरिता सप्तहाची गरज आहे. संसाराचे चिंतन केले तर संसारासारखा जड होतो. परमेश्‍वराचे चिंतन केले तर परमेश्‍वरासारखा होतो. म्हणुन सप्ताह हा भगवंताप्रती निष्ठा दृढ करण्यासाठी आहे. असेही महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*