लाभाविना प्रेम करणारा भक्तच खरा भगवंत प्रेमी

0

महंत रामगिरी महाराज, एकादशीच्या किर्तनाला पाच लाख भाविकांची उपस्थिती

गंगापुर (विशेष प्रतिनिधी)– भगवान भक्ताला भेटतो, विद्वानाला नव्हे, विद्वान झाला म्हणजे हुषार नव्हे! मानवाचा अहंकार हा त्याच्या अधोगतीला कारणीभूत ठरतो. विषयभोगी माणूस विलासी जीवन जगतो. स्वार्थी माणूस स्वतःचे हित पाहतो. पंचविषय भोगणारा माणसाची कमजोरी आहे. कोणतेही कार्य करतांना आपले त्यात काय हित आहे असा पाहणारा हा वर्ग आहे. लेकुराचे हित जानी माय माउलीचे चित्ती । ऐसी कळवल्याची जाती लाभाविना प्रीती ॥ या उक्तीप्रमाणे लाभाविना प्रेम करणारा भक्तच खरा भगवंत प्रेमी असतो असे प्रतिपादन महंत रामगिरीजी महाराज यांनी सदगुरु गंगागिरी महाराज 170 व्या अखंड हरीनाम सप्ताहाच्या एकादशीच्या कीर्तनाप्रसंगी केले.

कालच्या एकादशीच्या किर्तनाला पाच लाखाहुन अधिक भाविकंनी किर्तन श्रवण केले. गवळीशिवराचे ते माळरान भाविकांनी फुलुन गेले होते. सुरुवातीला महाराजांनी प्रवचन केले. त्यानंतर एकादशी असल्याने किर्तन केले. टाळ आणि मृदुंग यांच्या निनादात महंत रामगिरी महाराज यांचे यांच्या रसाळ वाणीतुन भाविकांनी कालचे किर्तन श्रवण केले. मुक्त कासाया म्हणावे । बंधन ते नाही ठावे ॥ या अभंगाचे विवेचन करतांना महाराज म्हणाले कि, भक्त व भगवंताचे प्रेम स्वतःच्या प्राणाच्याही पलीकडे असते.

जसे श्रीकृष्ण व गोपिकांचे प्रेम होते. गोपिकांना आपल्या सासू, सासरे, दीर, ननंद, यामध्ये श्रीकृष्ण भगवंत दिसतो. त्या प्रमाणे खर्‍या भक्ताला सर्वदूर भगवंत दिसतो. बंध आणि मुक्तीच्या पलीकडे जाऊन भक्ती केली पाहिजे. रजोगुण व तपोगुणाच्या पलीकडे जाऊन भक्ती केली पाहिजे. परंतु स्वार्थी मनुष्याला आपला संसार व आपण या पलीकडे काहीच दिसत नाही. संसार व आसक्तीचा त्याग केल्याशिवाय मोक्ष प्राप्ती होऊ शकत नाही. चित्तवृत्ती स्थिर झाली कि एकाग्रता निर्माण होते. तेथेच खरा भक्तीचा आनंद मिळतो. देह अहंकारापेक्षाहि ज्ञान अहंकार भयंकर असतो. राजस्वी लोक गीतेची उपासना करतात. तामसी लोक राक्षसी वृत्तीची उपासना करतात. बंधनमुक्त भक्तीला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात.

यावेळी शिवसेनेच्या वतीने एकादशी निमित्त शाबूदाणा खिचडीच्या माहाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, युवा नेते व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचेअध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार प्रशांत बंब, शिवसेना प्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, माजी सभापती संतोष पाटील जाधव, श्रीरामपुरच्या नगराध्यक्षा अनुराधा अदिक, सिध्दार्थ मुरकुटे, पंचायत समितीच्या डॉ. सौ. वंदना मुरकुटे,

माजी नगराध्यक्षा सौ. मंदाकिनी कांबळे, संतोष कांबळे, अस्तगावकर सराफचे अशोक बोर्‍हाडे, मधुकर महाराज, सुभाष गमे पाटील, पी. डी. गमे, तबाजी घोरपडे, दत्तु पाटील खपके, नवनाथ महाराज आंधळे, बहिरट महाराज, गणेशचे संचालक सुर्यकांत निर्मळ, जालिंदर निर्मळ,विष्णु निर्मळ, शिर्डीचे नितीनराव कोते, सुजीत गोंदकर, शरद मते, ज्ञानेश्‍वर विखे, दादासाहेब पठारे, पोपटराव गायकवाड, बाबासाहेब थेटे, रविंद्र चौधरी, नारायण बडाख, यांचेसह भाविकांची प्रचंड संख्येने उपस्थिती होती.

आजच्या सांगतेला मुख्यमंत्री येणार – 
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते ना. राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वेरूळ आश्रमाचे श्री 1008 शांतीगिरी महारज, अहमदनग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, यांचासह राज्यातील विविध खात्याचे मंत्री उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन सप्ताहाला शुभेच्छा देणार आहेत.

डॉ. सुजय विखे यांनी केली सप्ताहाची मागणी –
काल एकादशीच्या किर्तनात युवा नेते आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी महंत रामगिरी महाराज यांच्याकडे पुढील 171 व्या अखंड हरिनाम सप्ताहाची मागणी केली. साईबाबांची जन्मशताब्दी वर्ष असल्याने पुढील सप्ताह आम्हाला मिळावा, असा आग्रह त्यांनी केला. अनेक गावातील शिष्टमंडळांनी सप्ताहाची मागणी केली. यात साईबाबा संस्थान शिर्डी, कापसे पैठणी चे बाळासाहेब कापसे यांनी येवला येथे, शिंगवेतुकाई, पिंप्रीनिर्मळ, गोगलगाव (नेवासा), गोगलगाव (राहाता), सुभाष गमे पाटील, पी. डी. गमे, तबाजी घोरपडे यांनी केलवड, अदि गावांच्या शिष्टमंडळाने मागणी केली.

डॉ. विखे झाले वाढपी! – 
युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी या सप्ताहाला भेट दिली. सप्ताहाचा आग्रह धरला. कालची एकादशीची फराळाची पंगत असल्याने भाविकांनी पंगतीत वाढले. डॉ. विखे यांनी मागील वर्षीचा तांदुळनेर शिवारातील सप्ताहाचे कोलमडलेले नियोजन सुव्यवस्थित केले होते. विशेषत: पंगतीचे नियोजन केले. त्यांची कार्यपध्दती आनेकांनी वाखणली होती. त्यामुळे तो सप्ताह चांगल्या पैकी पार पडला. आज अनेक भाविकांना त्याची आठवण झाली. त्यावेळीही त्यांनी पंगतीत वाढले. कालही एकादशीचे फराळ त्यांनी पंक्तीत वाढले. त्यामुळे अनेकांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

आज काल्याचे किर्तन – 
आज या अखंड हरिनाम सप्तहाची सांगता होत आहे. आज सकाळी 10 वाजता महंत रामगिरी महाराजांचे काल्याचे किर्तन सुरु होणार आहे. मुख्यमंत्री 10.30 वाजता सप्ताह स्थळी येणार आहेत. दहा लाखाहुन अधिक भाविक येतील असे गृहित धरुन सप्ताह समितीने महाप्रसादाचे नियोजन केले आहे. महाप्रसादासाठी 600 पोते साखरेची बुंध्दी, 400 पोते चिवडा तयार करण्यात आला आहे. काल्याच्या किर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*