वडिलधार्‍यांच्या आज्ञेत राहाणे म्हणजे पारतंत्र्य नव्हे

0

महंत रामगिरी महाराज, भर उन्हातही सप्तहातील प्रवचनाला भाविकांची मांदियाळी

गंगापुर (विशेष प्रतिनिधी)- वडिलधार्‍यांच्या आज्ञेत राहाणे म्हणजे पारतंत्र्य नव्हे, तसे समजणे हे दुदैव आहे. ते आपल्याला फटकरतील पण ते आपल्या भल्यासाठीच असते. असे प्रतिपादन सराला बेटाचे प्रमुख महंत रामगिरी महाराज यांनी केले.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापुर तालुक्यातील गवळीशिवरा येथे सदगुरु गंगागिरी महाराज 170 व्या अखंड हरिनाम सप्ताहाला कालच्या पाचव्या दिवशी भाविकांचा अथांग सागर लोटला होता. नगर, औरंगाबाद, तसेच नाशिक जिल्ह्यातील भाविकांनी मांदियाळी या सप्तहात होती. महंत रामगिरी महाराज यांच्या रसाळ वाणीतील प्रवचनाचा लाभ भाविक घेत आहेत. आमटी भाकरी च्या अथांग पंगतींनी सप्ताह स्थळ फुलून गेले आहे.
कालच्या पाचव्या दिवशी महाराजांनी सत्संग, कुसंग, आणि दुसंग यावर प्रवचनात भर दिला. त्यामाध्यमातुन भाविकांना उपदेशही केले. महंत रामगिरी महाराज म्हणाले, स्वैराचार करणारांना वडिलधार्‍यांची अज्ञा आवडत नाही. वडिलधार्‍यांची अज्ञा पाळणे म्हणजे पारतंत्र्य समजले जाते हे दुदैव आहे. ते फटकारतीलही पण ते आपल्या भल्यासाठीच असते.
आपल्या संस्कृतीने आपल्याला संयम शिकविला आहे. स्त्रीने स्वतंत्र राहु नये, तिने पारतंत्र्यात म्हणुन नव्हे तर सुरक्षिततेसाठी म्हणुन राहावे. बाळ्या उन्हात खेळु नको, सावलीत मर अशी म्हणार्‍या आईच्या बोलण्यात प्रेम असते. तसे महापुरषांच्या कठोरतेत मृदुलता असते. महापुरुष कुणाला शाप देत नाहीत. दिला तर त्यात कल्याण असते. आपण संस्कृतीपासुन दुर चाललो म्हणुन समाजात अत्याचार वाढत आहेत.
पराशर ॠषी पाण्यात तपश्‍चर्या करतांना त्यांनी मच्छक्रिडा पाहिली. ते पाहुन त्यांचे मन जागृत झाले. श्रीमद्भागवतातील अजामिल ब्राम्हण पुजेसाठी फुल आणण्यासाठी बागेत गेल्यावर त्याला तेथे एका व्यक्तीला वेशेसी क्रिडा करतांना बघीतले. आणि त्याने घरात वेशा आणली. मनामध्ये संस्कार लुप्त असतात. काही प्रसंग आले तर ते जागृत होतात. जसे धुर पाहिल्यावर अग्निची आठवण येते.
मणुष्याने अंतकरणातील विकार घालविण्याचा प्रयत्न करावा, अंतकरणातील अशुभ वासना गेल्या म्हणजे वैराग्य निर्माण होते. शास्त्राचे अध्ययन हे वैराग्य निर्माण व्हावे म्हणुन असते. कपटाचा त्याग करा, वरुन गोड बोलणार्‍यांच्या मनात आतुन कपाट असते. कपटालाच दांभिकता असे म्हणतात. दांभिक मणुष्य सत्य बोलत नाही. मात्र सत्य बोलण्याचा आव आणतो. सत्य बोलल्या सारखे परंतु ते सत्य नाही. ते कपट असते. स्व:ता दु:खी राहायचे आणि दुसर्‍यालाही दु:खी करायचे, या कपटाचा त्याग करावा.
कृष्णाला मारण्यासाठी कंसाने कपट केले. त्याने कृष्णाला मारण्याठी पाठविलेले राक्षस परत आलेच नाहीत. असे सांगुन महाराज म्हणाले, ते राक्षस कृष्णाकडे गेल्यावर स्थान भ्रष्ट झाले. मणुष्य स्थानावर असेल तर बलवान असतो, परंतु स्थान भ्रष्ट झाल्यावर बलहिन होतो.
एखादी गोष्ट वाईट आहे, हे माहित असुनही ते करणे म्हणजे दुसंग असल्याचे स्पष्ट करुन महंत रामगिरी महाराज म्हणाले, कॅन्सर होईल हे माहिती असुनही विडी पिणे, दारु पिणे, तंबाखु खाणे या गोष्टी सुरुच आहे. या गोष्टींचा त्याग करावा. महिला मिसरी लावतात, ही मिसरी ही आरोग्याला घातक आहे.
मनाला स्थिर करण्यासाठी सतत प्रयत्नशिल असावे. विकार येवु नयेत म्हणुन भगवंताची पुजा करावी. भजन करावे, सतत हळु हळु प्रयत्न केले तर विकार, वासना कमी होतात. पिक पेरताने जसे गवत येत, तसेच संसार करताने विकार येतात.

अभिनेता सयाजी शिंदे ची भेट –
या सप्तहास मराठी, हिंदी, आणि तेलगु चित्रपटातील अभिनेता सयाजी शिंदे यांनी काल भेट दिली. कोपरगाव कारखान्याचे अध्यक्ष अशुतोष काळे, माजी मंत्री अशोक डोणगावकर, माजी आमदार आण्णासाहेब माने, कोपरगावचे राष्ट्रवादीचे चारुदत्त सिनगर, गणेश चे माजी उपाध्यक्ष पुरुषोत्तम गोरे, नांदुरचे सतीश इनामके, गजानन ढोकचौळे, भाउसाहेब अभंग, अस्तगावचे सुनिल चोळके, पिंपळसचे दत्तात्रय आमकर, वाकडीचे डॉ. विजय कोते, तात्याभाउ खर्डे, औरंगाबाद जिल्हा बँकेेचे अध्यक्ष सुरेश पाटील, कृष्णा डोणगावकर पाटील, आमदार प्रशांत बंब, संगमनेरचे रमेश गुंजाळ, नानासाहेब दिघे, खंडाळेचे नानासाहेब बोरकर, अस्तगावचे मधुकर पठारे, रमेश जवरे, अस्तगावकर सराफचे अशोक बोर्‍हाडे, मधुकर महाराज, दत्तु पाटील खपके, विठ्ठलदास असावा, नवनाथ महाराज, जि. प. सदस्य रमेश बोरणारे आदी उपस्थित होते.

सत्संग आणि पोपट – 
सत्संगा शिवाय सुविचार नाही. विकारांवर विजय मिळविण्यासाठी सत्संग महत्वाचा आहे. यावर महाराजांनी एक दृष्टांत सांगितला. ते म्हणाले, एक राजा वेश पालटुन आपल्या देशात काय चालले हे पाहाण्यासाठी फिरत होता. एका कसायाच्या घरासमोर आल्यावर त्याच्या पिंजर्‍यातील पोपटाने राजाकडे पाहिले. मारो, पकडो बहुत धनी दिखतो असे तो पोपट बोलला. पुढे राजा एका ब्राम्हणाच्या घरासमोर आला. त्यावेळी त्याच्या पिंजर्‍यातील पोपट म्हणाला, हे भाग्यवान तुम्ही कसे आहात. यावर राजाने त्या पोपटाला विचारले त्या पोपटात व तुझ्यात असा फरक कसा? त्यावर पोपट म्हणाला, कसायाच्या दारासमोरील पोपट भक्ष्य करणार्‍या लोकांचे वाक्य ऐकत होता. मला सत्संगाचा सहवास लाभला. सत्संगामुळे ज्ञान होते. राजहंस व कावळ्यांची कथा ही महाराजांनी भाविकांना सांगितली.

सत्संग आणि पोपट –
सत्संगा शिवाय सुविचार नाही. विकारांवर विजय मिळविण्यासाठी सत्संग महत्वाचा आहे. यावर महाराजांनी एक दृष्टांत सांगितला. ते म्हणाले, एक राजा वेश पालटुन आपल्या देशात काय चालले हे पाहाण्यासाठी फिरत होता. एका कसायाच्या घरासमोर आल्यावर त्याच्या पिंजर्‍यातील पोपटाने राजाकडे पाहिले. मारो, पकडो बहुत धनी दिखतो असे तो पोपट बोलला. पुढे राजा एका ब्राम्हणाच्या घरासमोर आला. त्यावेळी त्याच्या पिंजर्‍यातील पोपट म्हणाला, हे भाग्यवान तुम्ही कसे आहात. यावर राजाने त्या पोपटाला विचारले त्या पोपटात व तुझ्यात असा फरक कसा? त्यावर पोपट म्हणाला, कसायाच्या दारासमोरील पोपट भक्ष्य करणार्‍या लोकांचे वाक्य ऐकत होता. मला सत्संगाचा सहवास लाभला. सत्संगामुळे ज्ञान होते. राजहंस व कावळ्यांची कथा ही महाराजांनी भाविकांना सांगितली.

LEAVE A REPLY

*