जीवनात जो असंतुष्ट, तो खरा दरिद्री

0

महंत रामगिरी महाराज, गवळी शिवराला आले पंढरीचे स्वरुप,भाविकांचा ओघ वाढला!

तिसर्‍या दिवशी सप्ताहाचे प्रवचन मैदान भाविकांनी फुलुन गेले होते.
गंगापुर (विशेष प्रतिनिधी)– जिवनात जो असंतुष्ट असतो, तो खरा दरिद्री असतो. भगवंताचे स्मरण हीच खरी संपत्ती आहे. असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.
औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापुर तालुक्यातील गवळी शिवरा येथे सुरु असलेल्या सद्गुरु गंगागिरी महाराज 170 अखंड हरिनाम सप्ताहाच्या तिसर्‍या दिवसाच्या प्रवचनात महंत रामगिरी महाराज बोलत होते.
नेवासे येथील आमदार बाळासाहेब मुरकुटे, राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक, अशोक कारखान्याचे संचालक बबनराव मुठे, कृष्णा डोणगावकर, माजी खासदार भाऊसाहेब वाक्चौरे, गणेश कारखान्याचे अध्यक्ष मुकूंदरास सदाफळ, राहात्याचे माजी नगराध्यक्ष सोपान सदाफळ,बाजार समितीचे संचालक भाउसाहेब जेजुरकर, चांगदेव मेहेत्रे, ज्ञानेश्‍वर गाडेकर, बाबासाहेब कार्ले, कारभारी अनाप, लक्ष्मणराव सदाफळ, नगर जिल्हा परिषदेचे सदस्य तुकाराम मिसाळ, शिवसेनेचे नेवासा तालुका प्रमुख बाळासाहेब पवार, भेंड्याचे सरपंच भाऊसाहेब फुलारी, भाजपाचे बाळासाहेब पवार, बाबासाहेब जाधव, अशोकराव मिसाळ, दत्तु खपके, सोपान औताडे, भाउसाहेब ओमने, भगवानराव इलग, के. बी. राहाणे, एकनाथ पानसरे, यांचेसह अस्तगावकरा सराफचे अशोकराव बोर्‍हाडे, रमेश जवरे, मधु महाराज, नवनाथ महाराज आंधळे, बहिरट महाराज, बाबासाहेब चिडे, कडूभाउ काळे, भास्कर गायकवाड, दत्तात्रय घोगळ यांचेसह सुमारे दोन लाख भाविक उपस्थित होते.
कालच्या तीसर्‍या दिवशी प्रवचनाचे मैदान भाविकांनी फुलून गेले होते. श्रावणातील उन आणि सावल्यांचा खेळ, आणि हिरवाई ने नटलेल्या माळरानावर भाविकांची मांदियाळी, शेजारी प्रहरा मंडपा अखंड सुरु असलेला हरिनामाचा जागर, आणि भगव्या पतकां मुक्त डोलणार्‍या अशा मंगलमय वातावरणात सप्ताह सुरु आहे. कालच्या प्रवचनात महाराजांनी ज्ञानेश्‍वरीतील 9 व्या अध्ययातील 34 व्या ओविवर प्रवचनात प्रकाश टाकला. मन आणि अंतकरणातील भाव याविषयी बोलतांना महंत रामगिरी महाराज म्हणाले, अनावश्यक चिंतन हे दु:खाचे कारण आहे. उन्मत हत्ती सारखे मन धावत असते. मनाला अंकूश पाहिजे. यावर महाराजांनी तानसेन आणि बैजु बावरा यांची कथा सांगितली. ते म्हणाले, अंतकरणात भाव महत्वाचा आहे. अंतकरणात भाव आहेत म्हणुन वारकरी भजन करतात, त्यांना त्याचे ज्ञान नाही. भगवंत अंतकरणातील भाव जाणतो. मनाला विषया पासुन हटवा, मनावर संयम हवा.
भ्रमर आणि भ्रमनिरास!
भ्रमराचे (भुंग्याचे) कमळावर प्रेम असते. कमळात तो सुगंध आणि मकरंद गोळा करण्यासाठी जातो. सुर्यास्त झाला की तो अडकतो. भ्रमरात काही अवगुण आहेत. असे सांगतांना महाराज म्हणाले, कमळ सोडून भ्रमर भलतीकडेच जातो. भ्रमर लाकडेही फोडतो. भ्रमराच्या या अवगुणाचा त्याग करा. श्रावण महिना लागतो, पळसाचे पान हिरवे गर्द असते. त्यावर एक पोपट बसलेला असतो. पोपट हिरवा असतो, पानात पोपटाचा रंग लक्षात येत नाही. पोपटाची चोच लाल असते. भ्रमराला वाटले पळसाला लाल फुल आले. असा भ्रमराचा भ्रम झाला. श्रावणात पळसाला फुल येत नाही, आता आले असे त्याला वाटले. मकरंद घेण्यासाठी भ्रमर पळसाच्या त्या फुलाकडे जातो. पोपटाला वाटले जांभुळ आहे. पोपटाने भ्रमराला गिळंकृत केले. चोचीला फुल समजल्याने भ्रमर संपला! जेथे सुख नाही, तेथे भ्रमराने सुख शोधण्याचा प्रयत्न केला.
जिवनात जो असंतुष्ठ असतो, तो दारिद्री असतो, भगवंताचे स्मरण हीच खरी संपत्ती आहे. प्रवचनास बसलेले भाविक हे मोठे धन आहे. गंगागिरी महाराजांनी हे धन दिले. सर्वांनी एकत्रित बांधले. संपत्ती कमावने हे अंतिम ध्येय नसावे. कशाची अपेक्षा राहत नाही, ते खरे अंतिम ध्येय असे सांगत महाराज म्हणाले, जीवनाचे अंतिम ध्येय ससार नव्हे तर परमात्मा आहे. मणुष्य कमी महत्वाच्या गोष्टींचा त्याग करतो, संत महंत हे संसाराचाच त्याग करतात. याचा अर्थ त्यांना काहीतरी चांगले मिळाले. भगवंताच्या भक्तीत समर्पण भाव असावा.

सप्ताहाची मागणी वाढली! सप्ताहाची मागणी वाढली!  काल सप्ताहाची मागणी नगर जिल्ह्यातील नेवाशाचे आमदार बाळासाहेब मुरकूटे यांनी नेवासा येथे अखंड हरिनाम सप्ताह व्हावी अशी मागणी केली. तर श्रीरामपुरचे अविनाश अदिक व बबनराव मुठे यांनी हरेगाव येथे सप्ताह व्हावी अशी मागणी केली. काल च्या अखंड हरिनाम सप्ताहात नेवाशाचे आमदार बाळासाहेब मुरकूटे यांनी पंगतीत बसुन आमटी भाकरीचा स्वाद घेतला. त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा महाराजांनी सन्मान केला.

LEAVE A REPLY

*