दलित विद्यार्थ्यांनाही कर्जमाफी द्या : ना. आठवले

0
देवळाली प्रवरा (वार्ताहर)- राज्यासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांची कर्जमाफी करण्याचा भाजपा सरकारचा सर्वात ऐतिहासिक निर्णय आहे. याबरोबरच मागासवर्गीय महामंडळ, ओबीसी महामंडळ, भटके विमुक्त महामंडळाचे व समाजातील गरजू विद्यार्थ्यांनी बँकेद्वारे घेतलेले शैक्षणिक कर्जदेखील माफ करण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील रिपाइंचे तालुकाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन ना. आठवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. प्रारंभी ना. आठवले यांचे सोसायटी डेपोचौकात साईसंस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी स्वागत केले. तर नगरसेविका सुनीता थोरात यांनी त्यांना औक्षण केले.
यावेळी नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे, चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेशराव भांड, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, नगरसेवक सचिन ढूस, आदिनाथ कराळे, जगन्नाथ चव्हाण, आसाराम ढूस, शिवाजी मुसमाडे, बाळासाहेब मुसमाडे, शहाजी कदम, गोरख मुसमाडे, रिपाइंचे अशोक गायकवाड, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब गायकवाड, विजय वाकचौरे, सुभाष त्रिभुवन, विलास साळवे, यांच्यासह जिल्ह्यातून भीमसैनिक उपस्थित होते.

  ना. आठवले म्हणाले, देवळाली प्रवरामध्ये लवकरच दलित व मराठा ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. सुरेंद्र थोरात हे गेल्या 25 वर्षांपासून संघटनेत काम करीत असून त्यांचे पक्ष संघटन चांगले असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. 

 

LEAVE A REPLY

*