रामदास आठवले यांच्या आई हौसाबाई आठवले यांचे निधन

0

रामदास आठवले यांच्या आई हौसाबाई आठवले (वय 88) यांचे आज (गुरूवार) अल्प आजाराने मुंबईत निधन झाले.

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते.

सकाळी सातच्या सुमारास वांद्रे येथील गुरूनानक रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

हौसाबाई आठवले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ‘संविधान’ बंगल्यावर सकाळी 11 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे.

दुपारी तीन वाजता त्यांच्यावर खेरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील.

LEAVE A REPLY

*