Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

…तोपर्यंत आंबेडकरी समाज कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार नाही – आठवले

Share
मनसेने झेंडा बदलण्यापेक्षा मन बदलावे- ना. आठवले, Latest News, na. Athvale Statement Mns Sangmner

मुंबई | प्रतिनिधी 

जो पर्यंत माझा रिपब्लिकन पक्ष तुमच्यासोबत येत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी – काँग्रेस सोबत आमचा आंबेडकरी समाज जाणार नाही असे वक्तव्य रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय) अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले. ते काल त्यांच्या निवासस्थानी माध्यमांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी आणि त्यांच्या काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी ने कितीही प्रयत्न केला तरी बौद्ध –  आंबेडकरी समाज त्यांच्या सोबत येणार नाही. जोपर्यंत  मी आणि माझा रिपब्लिकन पक्ष  ठरवत नाही नाही तोपर्यंत माझा आंबेडकरी समाज त्यांच्या सोबत येणार नाही असे वक्तव्य  रिपब्लिकन  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.

आंबेडकरी जनतेचे मतदान राज्यात निर्णायक आहे. आंबेडकरी जनतेचा कौल ज्यानं मिळतो त्यांनाच सत्ता मिळते. आंबेडकरी जनतेचा कौल यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना रिपाइं महायुतीला मिळाला आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या महायुतीला पाठिंब्याच्या भूमीकेमुळे आंबेडकरी जनतेचे भरभरून मतदान महायुती च्या पारड्यात पडले. त्यामुळे महायुतीचे उमेदवार विजयी आणि काँग्रेस राष्ट्रवादी महाआघाडी चे उमेदवार पराभूत झाले.

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या उमेदवारांना आंबेडकरी बौद्ध जनतेची मते मिळाली नाही म्हणून राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले असल्याचा त्यांचे मत योग्य आहे.

पण त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी आंबेडकरी जनतेचे मतदान त्यांच्याकडे आता वळू  शकत नाही. मी आणि माझा रिपब्लिकन पक्ष  जेव्हा राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत होतो तेंव्हा आंबेडकरी जनतेचे मतदान त्यांना मिळत होते व त्यांच्या हाती  सत्ता येत होती.

आता माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्यामुळे आंबेडकरी जनतेचे मतदान महायुतीला मिळत असून राज्यात पुन्हा महाययुती लाच बहुमत मिळाले आहे असा दावादेखील आठवले यांनी केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!