Type to search

Breaking News Featured देश विदेश नाशिक मुख्य बातम्या

Deshdoot Exclusive : आधी राम मंदिर; नंतर काशी मथुरा! – शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा

Share

अयोध्या। कुंदन राजपूत

शिवसेनेने हिंदुत्व सोडले नाही.राम लल्लांचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येत आल्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हे स्पष्ट केले आहे.राम मंदिर उभारल्यानंतर काशी व मथुरा मंदिराबाबत निर्णय घेऊ,या शब्दात शिवसेना नेते व आयोध्यावारीचे शिवधनुष्य पेलणारे एकनाथ शिंदे यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.त्यांच्याशी साधलेला हा संवाद

साधू,महंत व हिंदुत्ववादी संघटनांमध्ये शिवसेनेबाबत नाराजी आहे?

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अयोध्येत स्पष्ट केले की, आम्ही भाजपला सोडले,हिंदुत्व नव्हे.शिवसेना हिंदुत्वावर ठाम आहे.भाजप म्हणजे हिंदुत्व नाही.

बाळासाहेब म्हणाले होते बाबरी घेतली.काशी व मथुरा देखील घेणार.याबाबत सेनेची भूमिका काय?

राम मंदिर आंदोलनात शिवसेनेची भूमिका महत्वाची आहे. शिवसैनिकांचे योगदान मोठे आहे.न्यायालयाच्या निर्णयाने अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.या ठिकाणी भव्यदिव्य राम मंदिर उभे राहणार आहे.शिवसेनेने मंदिर उभारणीसाठी एक कोटिची देणगी दिली आहे.राम मंदिर उभारल्यानंतर पुढिल भूमिका ठरवू.

पाच वर्ष हे सरकार टिकावे असा आशीर्वाद उध्दव ठाकरेंनी मागितला?

राज्यात महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याबद्दल उध्दव ठाकरे हे रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला आले. या कालावधीत शेतकरी कर्जमाफी,शिवभोजन थाळी व इतर महत्वपूर्ण कामे केली आहेत.गोर गरीब कष्टकरी लोकांसाठी काम करत आहे.हे सरकार कॉमन मिनिमम प्रोगॉमवर एकत्र काम करत आहे.पुढे देखील काम करत राहिल.

हिंदुत्वाच्या मुद्यावर देशभर निवडणुका लढविणार?

शिवसेनेची विचारसरणी ही हिंदुत्ववाची आहे.यापुढील काळात हिंदुत्वाच्या मुद्यावर देशभरात पक्षाचा विस्तार करुन निवडणूक लढवली जाईल.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!