Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशअयोध्येत राममंदिर बांधकामाला सुरुवात

अयोध्येत राममंदिर बांधकामाला सुरुवात

अयोध्या |Ayodhya –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन करण्यात आल्यानंतर बुधवारपासून (12 ऑगस्ट) मंदिराच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत एक व्हिडिओ श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे सरचिटणीस चंपत राय यांनी शेअर केला आहे. Ram temple

- Advertisement -

अयोध्येत आजपासून राममंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे. सध्या बांधकामाची गती जास्त नसली, तरी नजीकच्या काळात गती वाढेल आणि तीन वर्षांमध्ये येथे श्रीरामाचे भव्य मंदिर उभे झालेले असेल, असे त्यांनी सांगितले आहे.

राममंदिरासाठी देणगी देण्यास इच्छुक असलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांनी आपल्या क्षमतेनुसार दान करावे, असे सांगताना त्यांनी न्यासचे बँकेतील खाते क्रमांक आणि अन्य माहिती सादर केली.

देश-विदेशातील कोट्यवधी रामभक्तांना मंदिराच्या बांधकामात आपले योगदान देण्याची इच्छा आहे, अनेकांनी ती आमच्याकडे व्यक्तही केली आहे. त्यांसाठी मी न्यासचा खाते क्रमांक आणि अन्य माहिती आम्ही आज सादर केली आहे. आम्हाला केवळ देणगीच नको, तर तुमचे पाठबळ आणि आशीर्वादही हवे आहेत. हे राममंदिर भव्य आणि अद्भूत असेच असेल, असेही ते म्हणाले.

खोदकाम सुरू –

एल अ‍ॅण्ड टी या नामांकित बांधकाम अद्योग समूहाकडे राममंदिराच्या बांधकामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या कंपनीचे तज्ज्ञ अधिकारी येथे दाखलही झाले आहेत. या परिसरात आता खोदकामाला सुरुवात झाली आहे. मंदिराच्या मजबूतीसाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या