नियोजन समितीची निवडणूक होणारच : राम शिंदे

0
पालकमंत्री, विरोधीपक्ष नेत्यांत गुप्तगू
अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्हा नियोजन समितीची निवडणूक जाहीर झाली असून ही निवडणूक बिनविरोध न होता या ठिकाणी निवडणूकच होणार. पुढे पहा काय काय होते, असे सूचक वक्तव्य पालकमंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.
शनिवारी जिल्हा शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री शिंदे पत्रकारांशी बोलत होते. तत्पूर्वी भेंड्याहून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या गौरव समारंभ आटोपून शिंदे विश्रामगृहावर आले होते. शिंदे थांबलेल्या विश्रामगृहातील सुटमध्ये विखे दाखल झाले. त्यानंतर पालकमंत्री शिंदे आणि विरोधी पक्षनेते विखे यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली.
त्यानंतर विखे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीला निघून गेले. सुटमधून बाहेर आल्यानंतर पालकमंत्री शिंदे यांना जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीबाबत विखे यांच्याशी चर्चा झाली का? याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावर या विषयावर कोणतीच चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, जिल्हा नियोजन समितीची निवडणूक बिनविरोध होण्याऐवजी त्या ठिकाणी निवडणूक होणार असल्याचे त्यांचे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यावर न थांबता पुढे पुढे काय काय होते, असे सूचक वक्तव्य केले.

LEAVE A REPLY

*