राम रहीम खटल्याचा आज निकाल

0
हरियाणा : ‘डेरा सच्चा सौदा’चा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्याशी संबंधित पत्रकार छत्रपती हत्याकांड प्रकरणी हरियाणातील पंचकूला येथील सीबीआयचे विशेष न्यायालय शुक्रवारी (दि.११)  निर्णय देणार आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणासह पंजाबमध्ये कडक सुरक्षा बंदोबस्त तैनात करून अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेषत: सुनारिया, सिरसा येथील डेराचे मुख्यालय आणि पंचकूलामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

१५ वर्षांपूर्वी दोन महिलेंवरील अत्याचार प्रकरणात डेरा सच्चा चा प्रमुख बाबा राम रहीम यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला गेला होता. त्याच्यावर कलम ३७६, ५०९ आणि ५०६ दाखल करण्यात आला होता. आज त्या प्रकरणाचा निकाल देण्यात येणार आहे. राम रहीम याचे भक्त पंजाब आणि हरियाणात मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सुरक्षेची पुरेशी व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

पंजाब सरकारने आठ जिल्ह्यांत सुरक्षा दलाच्या कंपन्या तैनात केल्या आहेत. पंचकूला येथील विशेष न्यायालयात आरोपी गुरमीत राम रहीम व्हिडिओ कॉन्स्फ्रेंसिंगद्वारे हजर होणार आहे. तर या प्रकरणातील अन्य आरोपींना प्रत्यक्ष न्यायालयात हजर केले जाणार आहे.

 

LEAVE A REPLY

*