रक्षाबंधना निमित्त बीएसएनएलची खास ऑफर

0

नवी दिल्ली : रक्षाबंधनाच्या निमित्ताने बीएसएनएलने इतर कंपन्यांना टक्कर देणारा प्लॅन आणला आहे. ग्राहकांना फक्त ३९९ रुपयात ७४ दिवसांसाठी अमर्यादित सुविधा मिळणार आहेत. यामध्ये व्हाईस कॉल, डाटा आणि एसएमसचा अर्मयादित वापर ग्राहकांना करता येणार आहे.

बीएसएनएलने रक्षाबंधनानिमित्तच्या ऑफरमध्ये लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलचाही समावेश केला आहे. या ऑफरचा लाभ दिल्ली व मुंबई नेटवर्कमध्येही घेता येणार आहे.

मोबाईलधारक बोलण्यात व्यस्त असल्यास रिंग बॅक टोन ही ऐकविण्याची सुविधा मोबाईल ऑपरेटर कंपनीकडून दिली जाते. या ऑफरला एसटीव्ही ३९९ हे नाव देण्यात आले आहे. ही ऑफर आज पासून सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

*