चंद्रग्रहण असल्याने दुपारपर्यंत आटोपून घ्या ‘रक्षाबंधन’

0

नाशिक | ‘रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण यंदा एकाच दिवशी आल्यामुळे रक्षाबंधनाचा मुहूर्त काय असेल अशी सगळीकडेच विचारणा होत आहे. अनेक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

उद्या सोमवारी (दि.७) चंद्रग्रहण असल्याने दुपारपर्यंत रक्षाबंधन करावे,’ अशी माहिती लक्ष्मीकांत जोशी यांनी दिली.

उद्या रात्री १०.५२ ते १२.४९ दरम्यान ग्रहण पर्वकाळ असून, या ग्रहणाचे वेध दुपारी एकपासून सुरू होणार आहेत. त्यामुळे दुपारी एक वाजण्यापूर्वी पूर्वी घरातील सर्वांचे भोजन होईल अशा पद्धतीने कुलधर्म कुलाचार निमित्ताचे पूजन करावे. अशी माहिती त्यांनी दिली.

सोमवारचा उपवास असल्यास दुपारी एक वाजण्यापूर्वीच फलाहार करावा आणि वेधात सायंकाळी सोमवारची पूजा करून उपवास सोडत आहे’, असा संकल्प करून नुसते तीर्थ घेणे योग्य होईल.

कारण वेधात जलपान निषेध नाही, मात्र भोजन निषेध आहे. यापूर्वी ६ ऑगस्ट १९९० या दिवशी श्रावण पौर्णिमेस सोमवारी चंद्रग्रहण होते आणि त्यानंतर १६ ऑगस्ट २००८ शनिवारी श्रावण पौर्णिमेस चंद्रग्रहण आले होते.

LEAVE A REPLY

*