#RakshaBandhan : लक्ष्मीकांत बेर्डेंची मुलगी आहे 15 चुलत भावंडांची एकुलती एक बहीण

0

लक्ष्मीकांत आणि प्रिया बेर्डे यांची एकुलतीएक मुलगी आहे स्वानंदी.

स्वानंदी आता 16 वर्षांची आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले तेव्हा अभिनय सात वर्षांचा तर स्वानंदी फक्त चार वर्षांची होती.

आठवणींना उजाळा देताना अभिनय म्हणाला, ” स्वानंदीची रक्षाबंधनाच्या दिवशीची एक आठवण म्हणजे, आमच्या बेर्डे कुटुंबात आम्ही एकुण 15 चुलत भावंड आहोत. आमच्यात स्वानंदी ही एकच मुलगी आहे. बाकी सगळी मुलं आहेत. स्वानंदी तीन किंवा चार वर्षांची होती. आम्हा 15 भावंडाना तिला ओवाळायचे होते. पण तीन जणांना ओवाळल्यानंतर ती थकून गेली. माझा हात दुखतोय म्हणून रडायला लागली. मी तिचा हात पकडून सगळ्यांना ओवाळलं, अगदी रडत-रडत तिने सगळ्यांना ओवाळलं होतं. आजही त्या दिवसाची आठवण रक्षाबंधनाच्या दिवशी आवर्जुन आम्हाला होत असते.”

 

LEAVE A REPLY

*