तनुश्रीने रेसलरला पैसे दिले – राखी सावंतचा आरोप

0

 मुंबई :  ‘मी टू’ मोहिमेतील आरोप प्रत्यारोपमुळे राखी सावंत व अभिनेत्री तनुश्री दत्ता यांची जोरदार चर्चा रंगल्या होत्या. आता राखीने पुन्हा एकदा तनुश्रीवर आरोप केला आहे.

सोमवारी एका रेसलिंग शोदरम्यान विदेशी रेसलरकडून आपटून घेतल्यानंतर आयटम गर्ल राखी सावंत हिने तनुश्री दत्ता हिच्यावर आरोप केले आहेत. त्या विदेशी रेसलरला मला आपटण्यासाठी तनुश्रीने तिला पैसे दिल्याचा आरोप राखीने केला आहे.

आरोप -प्रत्यारोप करत चर्चेत राहण्याचा हा फंडा आता ट्रेंडच बनू लागला आहे. यामुळे राखीने आरोप केले कि त्या आरोपाची सोशलवर खिल्ली उडू लागली आहे.

LEAVE A REPLY

*