राखी सावंतचा सनी लिओनीवर आरोप

0
मुंबई : आयटम गर्ल राखी सावंत आणि कॉन्ट्रोवर्सी या एकाच नाण्याच्या दोन बाजू. राखीच्या नावासोबतच कॉन्ट्रोवर्सी, वाद ही तिच्यासाठीची विशेषणं लागूनच येतात. राखी सावंत म्हटलं की काही ना काही असणारच. आता राखी सावंतने आपला मोर्चा सनी लिओनीकडे वळवला आहे. राखी सावंतने सनी लिओनीवर गंभीर आरोप केले आहेत. सनी लिओनीवर केलेल्या आरोपांमुळे राखी चर्चेत आली आहे. राखीने सनीवर एक गंभीर आरोप केला आहे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सनीने तिचा मोबाइल नंबर पॉर्न इंडस्ट्रीमध्ये दिल्याचा आरोप राखीने केला आहे.

राखी म्हणाली की, ‘सनीने माझा मोबाइल नंबर प्रौढ मनोरंजन उद्योगात दिला, यानंतर तिथून मला अनेक फोन येऊ लागले. ते माझ्या व्हिडिओबद्दल आणि मेडिकल सर्टिफिकेटबद्दल विचारत आहे. मला चांगली रक्कम देण्यासही ते तयार आहेत. पण मला या कामात काहीही स्वारस्य नाही. या क्षेत्रात जाण्यापेक्षा मी मरणं पसंत करेन.’

राखीने तिच्या बॉलिवूड करिअरमध्ये ‘मालामाल विकली’, ‘क्रेझी ४’, ‘एक खिलाडी एक हसीना’ आणि ‘लूट’ अशा सिनेमांमध्ये हिट आयटम साँग केले आहेत.

LEAVE A REPLY

*