राकेश रोशनवरील कॅन्सर सर्जरी यशस्वी

0
मुंबई : बॉलिवूडला कॅन्सरचे ग्रहण सुरू असताना दिग्दर्शक राकेश रोशन यांच्या कॅन्सरची बातमी समोर आली होती. ह्रतिक रोशननेच त्यांच्या कॅन्सरच्या प्राथमिक स्टेजबद्दल सांगितले होते. मात्र, त्यांच्यावर पहिली शस्त्रक्रिया अलिकडेच पार पडली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे राकेश रोशन यांनी सांगितले आहे. सोशल मीडियावर त्यांनी याबाबत माहिती दिली.

राकेश रोशन यांचा कॅन्सर काही दिवसापूर्वी लक्षात आला. त्यांचा हा कॅन्सर प्राथमिक अवस्थेत होता. त्यांनी निर्धाराने कॅन्सरचा सामना करण्याचे ठरविले होते. सर्व रोशन कुटुंबिय त्यांच्या पाठीशी ठाम राहिले आहेत. त्यांच्या चाहत्यांनीही त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली होती.

LEAVE A REPLY

*