खासदारकीची शपथ घेतल्यानंतर राणेंचे हे वक्तव्य होतेय व्हायरल

0

 

मुंबई : महाराष्ट्रातून भाजप कोट्यातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेल्या सहा खासदारांचा आज शपथ विधी सोहळा आज पार पडला.

राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर खा. राणे माध्यमांशी काय बोलतील याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. अखेर राणे माध्यमांसमोर आले. ते म्हणाले, राज्यसभेवर पाठवले याचा अर्थ मी गडचिरोलीसारख्या ठिकाणी बदली केली असा समज कोन्हीही करू नये. राज्यात सर्वच पदे भूषवली आहेत. आता देशाचा कारभार जिथून चालतो तिथे आपण गेलो असून तिथेही काम करायला आवडेल असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, केरळ भाजपचे नेते के. मुरलीधरन, माजी महसूलमंत्री नारायण राणे यांनी शपथ घेतली. तर शिवसेनेचे अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांनीही शपथ घेतली.

भाजपचे खा. जावडेकर, के. मुरलीधरन आणि नारायण राणे यांनी हिंदीतून शपथ घेतली तर शिवसेनेचे खा. अनिल देसाई राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांनी मराठीतून शपथ घेतली.

त्यानंतर खासदार राणे काय बोलतील याकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. यावेळी राणे म्हणाले, राज्यसभेतील खासदारकी ही गडचिरोलीत बदली केल्याची शिक्षा नाही किंवा अडगळीच्या ठिकाणी राज्याबाहेर पाठविले असे काहीही नाही.

मी राज्यातील सर्वच पदे भुषविली आहेत. त्यामुळे माझा राज्यातील कोटा पूर्ण झाला आहे. त्यामुळे आता मला राज्यसभेत काम करायला आवडेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

*