Type to search

देश विदेश राजकीय

राज्यसभेच्या 2 जागांसाठी मतदान, विदेशमंत्री भाजपाचे उमेदवार

Share

गांधीनगर – राज्यसभेच्या गुजरातमधील दोन जागांसाठी शुक्रवारी विधानसभा भवनात मतदान सुरू आहे.

भाजपाकडून विदेशमंत्री एस.जयशंकर आणि ओबीसी नेते जुगलजी ठाकोर उमेदवार आहेत. तर काँग्रेसने चंद्रिका चूडासामा आणि गौरव पंड्या यांना उमेदवारी दिली आहे.

मंत्री सौरभ पटेल, प्रदीपसिंग जडेजा यांनी सर्वप्रथम मतदान केले.

सकाळी 9 वाजता मतदानाला प्रारंभ झाला. सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.

दोन्ही जागांसाठी वेगवेगळे मतदान होत असल्याने जिंकण्यासाठी उमेदवाराला 50 टक्के मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे विजयासाठी 88 मतांची गरज आहे.

काँग्रेसने आपल्या 71 पैकी 65 आमदारांना दोन दिवसाआधी बनासकांठा येथील रिसॉर्टमध्ये मुक्कामी ठेवले होते. ते सर्व सकाळी 10.30 वाजता मतदानासाठी पोहचले, अशी माहिती एका काँग्रेस नेत्याने दिली.

लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे अमित शहा आणि स्मृती इराणी यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. ते अनुक्रमे गांधीनगर आणि अमेठी मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत विजयी झाले.
त्यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागांसाठी मतदान होत आहे.

182 सदस्यांच्या विधानसभेत आपल्या संख्याबळाच्या जोरावर दोन्ही जागांवर भाजपाला विजयाची संधी आहे.

182 आमदारांपैकी 175 मतदानासाठी पात्र आहेत. भाजपाचे 100 तर काँग्रेसचे 71 आमदार आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!