Friday, May 3, 2024
Homeनगरराजुरीच्या रस्त्याचे काम त्वरित मार्गी लावा - आ. विखे

राजुरीच्या रस्त्याचे काम त्वरित मार्गी लावा – आ. विखे

राजुरी |वार्ताहर|Rjaur

राजुरी येथील चार मोरया ते वरवंडी आई ओढ्या जवळून जाणार्‍या रस्त्याचे काम त्वरित मार्गी लावावे, अशी सूचना आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

- Advertisement -

राहाता तालुक्यातील राजुरी येथील उसाच्या पिकासह डाळिंब तसेच पावसाने पडलेल्या घरांची पाहणी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकार्‍यांसमवेत प्रत्यक्ष नुकसानग्रस्त शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी भास्कर एकनाथ लाळगे यांच्या वादळाने पडलेल्या उसाच्या शेताची पाहणी करून आप्पासाहेब रामजी लाळगे यांच्या डाळिंब बागाची पाहणी करून चार मोरया ते वरवंडी आई ओढ्याचा बंद केलेला रोडची पाहणी करून तो त्वरित मार्गी लावून नागरिकांची होणारी अडचण दूर करावी, अशी सूचना अधिकार्‍यांना त्यांनी दिली.

यानंतर केरू भालेराव यांच्या घराची भिंत पावसाने पडली असल्यामुळे याचीही पाहणी करून राजुरी ते ममदापूर राहिलेला आठशे मीटरचा शिवरस्ता मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना केल्या असून उर्वरित नुकसानग्रस्त शेतकर्‍यांची पिकांचे पंचनामे संबंधित अधिकार्‍यांनी करावेत अशा सूचनाही आ. विखे पाटील यांनी दिले आहेत.

यावेळी त्यांच्यासमवेत तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका कृषी अधिकारी शिंदे, बांधकाम विभागाचे अभियंता करपे, बाभळेश्वरचे सर्कल जोंधळे, तलाठी कानडे, ग्रामविकास अधिकारी रवींद्र बोरसे, सरपंच सुरेश कसाब, सोसायटीचे चेअरमन अशोक गोरे व्हाईस चेअरमन डॉ. सोमनाथ गोरे, उपसरपंच सुधाकर गोरे, प्रवरा बँकेचे संचालक मारुती गोरे, बाजार समितीचे संचालक गोरक्ष गोरे, शिवा गोरे, रामजी लाळगे, आप्पासाहेब लाळगे, बापूसाहेब गोरे, जालिंदर गोरे, संजय गोरे, अनिल भालेराव, रावसाहेब गोरे, अशोक भालेराव बाबासाहेब शेळके अण्णासाहेब गोरे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या