Type to search

Breaking News Featured नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

Photo Gallery : राजूर वन्यजीव क्षेत्रातील ‘मौजे शिरपुंजे बुद्रुक’; जाणून घ्या सविस्तर

Share

कळसुबाई हरिशचंद्रगड अभयारण्यातील राजूर वन्यजीव वनक्षेत्रातील नियतक्षेत्र शिरपुंजे बुद्रुक मधील मौजे शिरपुंजे बुद्रुक हे गाव राजूर पासून २२ कि.मी. अंतरावर आहे. गावाचे एकूण वनक्षेत्र ४२३.६५९ हे. क्षेत्र आहे. त्यापैकी कक्ष क्रमांक ९८ चे क्षेत्र २४९.७५ हे. वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रात श्रीक्षेत्र भैरवनाथ देवस्थान व गड आहे. या गडाची समुद्र सपाटी पासूनची उंची १२५५.७१ मी. आहे.

या गडावर शिवकालीन भैरवनाथ गुफा मंदिर आहे व मंदिराच्या बाजूला कोरीव काम केलेली एक मोठी गुफा आहे. तसेच गडावर २ मोठया गुफेमध्ये स्वच्छ पाण्याचे दोन पिण्यासाठी जलकुंभ आहेत व बाजूला एक राहण्याची कोरीव कोठार आहे. आजूबाजूला बारा मोठे पाण्याचे हौद आहेत.

गडावर रंगी – बेरंगी दुर्मिळ फुले उदा . दोइफुडीची फुले, सोनकीची फुले, देवतुरादाची फुले, निळाईची फुले, पंधाची फुले यासारखी असंख्य प्रकारची फुले हंगामी वेळेत पाहण्यास मिळतात व विविध प्रकारची वनौषधी रोपटे व वेली दिसून येतात. गडाच्या कडा कपारीमध्ये अनेक प्रकारचे पशु – पक्षी व प्राण्यांचा वावर आजही पाहण्यास मिळतो.

गडावर गेल्यावर गडाच्या माथ्यावरुन पश्चिम दिशेस घनचक्कर या डोंगराचे खास सौदर्य पाहण्यास मिळते. भैरवनाथ या गडाच्या पायथ्याशी वनदेव ऋषी राहत असे व त्याच ठिकाणी त्यांची समाधी बांधलेली आहे व गडाच्या मध्यभागी घोडयांना राहण्यासाठी मोठी गुफा आजही गडावर आहे. ऑक्टोंबर महिन्यात दरवर्षी प्रमाणे दोन दिवसांची यात्रा भरते व आठवडे रविवार या दिवशी भाविक मोठया संख्येने दर्शनासाठी गर्दी करतात. तसेच भैरवनाथ हा शंकराचा दुसरा अवतार आहे, असे समजले जाते.

(Source : APCCF Wildlife West Zone Mumbai)

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!