राजूमामाचा अड्डा उद्ध्वस्त

0

21 जणांवर कारवाई : सहाय्यक अधीक्षक शिंदे यांची कामगिरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर शहरातील चितळेरोड येथे सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यात 16 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू दत्तात्रय जाधव, देविदास सुरेश दिंडे, राहुल अशोक भरेकर, प्रकाश अर्जुन मटारे, फिरोज खान, विजय गंगाराम गवळी, संजय बाबुराव जाधव, शाम दशरथ सूर्यवंशी, जगदीश वामन वाकोडे, सुनील प्रकाश सुडके, सागर भाऊसाहेब थोरात, जयदेव रमेश सातपुते, देविदास रामचंद्र कटके, मनोहर उद्धव गवळी, कैलास अर्जुन वाघ, अविनाश बबन वैद्य अशा 16 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तर अन्य ठिकाणी छापे टाकून शेख छोटू शामशोद्दीन, फौराज सुलेमान खान, रमेश गुलाबराव झेंड, जग्गू वाकडे, राजू मामा जाधव, देविदास सुरेश दिंडे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शहरात दारूबंदी असून देखील छुप्या पद्धतीने मोठी दारू विक्री चालू आहे. तसेच राजू मामाचे मटके पोलिसांसह प्रशासनाला सर्वश्रृत आहेत. त्यावर शहरात नव्याने हजर झालेले सहायक पोलीस अधीक्षक यांनी चांगलेच लक्ष घातले आहे.

राजू जाधव यांच्यावर तोफखाना किंवा कोतवाली पोलीस ठाण्याकडून कोणतीही कारवाई होत नाही. एव्हाना त्यांचे नाव तडीपार किंवा प्रतिबंधात्मक कारवाईत कोठे दिसत नाही. खाकीच्या वरदहस्तामुळे असे अनेक अवैध धंदे करणारे सोकावले असून दारू, जुगार, मटका, ताडी, नशिले पदार्थांची विक्री करणार्‍यांना अभय मिळत आहे.

विशेष म्हणजे या आरोपींची दुकाने पोलीस मुख्यालय, पोलीस ठाणे, शाळा, महाविद्यालये अशा ठिकाणच्या परिसरात जोमात सुरू आहेत. मात्र पोलिसांकडून डोळेझाकची भूमिका पार पाडली जात आहे. सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या पारदर्शी कारभारातून नगरकरांना या अवैध व्यवसायात मुक्ती मिळेल अशी अपेक्षा आहे.

मामावर दोन गुन्हे
राजू मामा जाधव याच्यावर एकापाठोपाठ दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या दोन्ही कारवाया सहायक पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांनी केल्या आहेत. पोलीस ठाणे केवळ अर्थपूर्ण तडजोडीमुळे बघ्याची भूमिका घेत आहे. जाधव यांच्यावर आजवर 15 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असतील. मात्र प्रशासन त्याच्यावर कडक कारवाईसाठी प्रस्ताव का दाखल करीत नाही. हा प्रश्‍न अनेकांना अनुत्तरीत आहे.

नागरिकांनी सहकार्य करावे.
शहरात कोणत्याही व्यक्तीची दादागिरी किंवा राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. जो गुन्हा करेल त्याला पाठिशी घातले जाणार नाही. शहरात कोणी अवैध धंदा करत असेल तर 7719871920 या मोबाईलवर किंवा 2416106 या क्रमांकावर फोन करावा. माहिती देणार्‍याचे नाव गुपीत ठेवण्यात येईल. अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
– अक्षय शिंदे (सहायक पोलीस अधीक्षक)

LEAVE A REPLY

*