राजुल वासा केंद्राचे कार्य गौरवास्पद

0

नाशिक, ता. ८ : आज समाजात अनेक मेदुपिडीत महाग उपचार करू शकत नाही. विना उपचार अनेकांचे प्राणही जात आहेत परंतु डॉ राजुल वासा अनेक वर्षांपासून त्या मेदू पीडित रुग्णांवर मोफत व्यायाम उपचार करत आहेत.

नासिक येथील राजुल वासा येथील केंद्राचे कार्य अभिमानास्पद आहे, असे गौरव उद्गार आमदार बच्चू कडू प्रणीत प्रहार संघटनेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष दत्तूभाऊ बोडके ह्यांनी केले .

राजुल वासा केंद्रात सीमा पानमंद ह्यांच्या वाढदिवसा निमित्ताने मेंदुघात रुग्णांसाठी उपचार यासाठी लागणारे उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी केंद्राचे डॉ संदीप भानोसे सर यांनी केंद्राची महत्वपुर्ण कार्याबाबत माहिती दिली. तसेच योगेश चौधरी हे फिनलेंड या देशात जाऊन नुकतेच रुग्णसेवा करुन परत आले त्यांचेही अभिनंदन  व सत्कार करण्यात आला. .

यावेळी प्रहारचे श्री अनिल भडांगे ,श्री वैभव नागरे ,श्री अभिजित दुसाने , डॉ. सुजित सुराणा ,श्री प्रकाश चव्हाण ,प्रा.सोमनाथजी मुठाळ सर ,श्री जगनभाऊ काकडे, श्री श्याम मोरे, श्री बबलु मिर्झा ,कु. मेघना पानमंद ,कु.नीव पानमंद कु. श्रद्धा बोरकर  उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन शेखर गाडे ह्यांनी केले. आभार प्रदर्शन शेखर जोशी ह्यांनी केले.

LEAVE A REPLY

*