Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

भारताला मिळणार आज पहिले राफेल विमान; काय आहेत राफेलची वैशिष्ट्ये जाणून घ्या

Share

पॅरीस | वृत्तसंस्था 

आज विजयादशमी आणि भारतीय वायुदल दिनानिमित्ताने भारताला पहिले राफेल जेट विमान फ्रांसकडून मिळणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह फ्रान्सला पोहोचले असून ते याच राफेलमधून फ्रान्स एअरपोर्टच्या तळावरून उड्डाण करणार आहेत.

राफेल आज भारताला सुपूर्द करण्यात येणार असून एका हस्तांतरण सोहळा यानिमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान, भारताला राफेल पुढील वर्षी मिळणार आहेत.

राफेल दोन इंजिन असलेले लढाऊ विमान आहे. याची निर्मिती द सॉल्ट नावाच्या फ्रान्सच्या कंपनीने केली आहे. यात मिटिऑर आणि स्काल्प मिसाइल तैनात आहेत, त्याद्वारे राफेलमुळे भारताला हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता प्राप्त होणार आहे. ही दोन्ही क्षेपणास्त्रे राफेलचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

राफेल जेटची वैशिष्ट्ये 

१) राफेल असे लढाऊ विमान आहे ज्याला कुठल्याही प्रकारच्या मिशनवर पाठवले तरी ते जाऊन आपली कामगिरी चोखपणे बजावते. भारतीय वायुदलाची यावर खूप काळापासून नजर होती.

२) हे विमान एका मिनिटात ६० हजार फुटांची उंची गाठू शकते याची इंधन क्षमता १७ हजार किलो आहे.

३) राफेल कुठल्याही प्रकारच्या हवामानात एका वेळी अनेक कामे करण्यास सक्षम आहे. म्हणून याला मल्टीरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणून ओळखले जाते.

४) राफेल मध्ये असलेले स्काल्प क्षेपणास्त्र हवेतून जमिनीवर मारा करण्यात सक्षम आहे.

५) राफेलची मारा करण्याची क्षमता ३,७०० कि.मी. पर्यंत आहे तर स्काल्पची रेंज ३०० कि.मी. आहे.

६) विमानाची इंधन क्षमता १७ हजार कि.ग्रॅ. आहे.

७) हे अँटी शिप अटॅक, परमाणू हल्ला, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लाँग रेंज मिसाइल अटॅकमध्ये अव्वल आहे.

८) राफेल २४,५०० किलोपर्यंतचे वजन वाहून नेऊ शकते आणि ६० तासांपर्यंत अतिरिक्त उड्डाण करू शकते.

९) राफेलचा वेग २,२२३ कि.मी. प्रति तास आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!