Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याराज ठाकरेंची फडणवीस-चंद्रकांत पाटलांशी चर्चा

राज ठाकरेंची फडणवीस-चंद्रकांत पाटलांशी चर्चा

मुंबई | Mumbai

भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. याचे पडसाद राज्यभर उमटले…

- Advertisement -

चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये शाईफेक करण्यात आली. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्यांवर पोलिसांनी 307 हे कलम लावण्यात आले, तसेच पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

307 हे कलम काढाव आणि पोलिसांचं निलंबन मागे घ्यावे, अशी विनंती त्यांनी चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. या विनंतीला दोघांनीही तत्काळ होकार दिला. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांचे होकार दिल्याबद्दल आभारही मानले आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड परिसरातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी या पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि इतर काही नागरी संस्थांचे पदाधिकारी राज ठाकरे यांना भेटले. आरोपींवरचे 307 कलम काढावे आणि पोलिसांचे निलंबन मागे घ्यावे, यासाठी मध्यस्थी करा, अशी विनंती या शिष्टमंडळाने राज ठाकरेंकडे केली होती. त्यानंतर राज ठाकरेंनी फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांशी चर्चा केली आणि त्यांनी राज ठाकरेंच्या विनंतीला होकार दिला.

- Advertisment -

ताज्या बातम्या