Type to search

Featured maharashtra

मराठा समाजाच्या तरुणांच्या नियुक्तीचा प्रश्न विधीमंडळात मांडू

Share

देवेद्र फडणवीस व प्रविण दरेकर यांनी घेतली आंदोलनकत्यांची भेट

मुंबई :

गेल्या २७ दिवसांपासून मराठा समाजाच्या तरुणांचे त्यांच्या न्याय मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे, तरीही त्यांना न्याय देण्यासाठी सरकार अपयशी ठरले, ही सरकारची उदासिनता असून हे सरकार असंवेदनशील आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या तरुणांना न्याय मिळवून देण्याकरीता आम्ही विधी मंडळाच्या सभागृहात आक्रमक भूमिका मांडू, असे स्पष्ट प्रतिपादन विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केले.

आझाद मैदान येथे गेल्या २७ दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाला बसलेल्या मराठा समाजाच्या तरुणांची आज देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर व नितेश राणे यांनी भेट घेतली. यावेळी प्रविण दरेकर यांनी मराठा समाजाच्या तरुणांच्या आंदोलनाच्या मागील भूमिका समजवून सांगितली. २७ दिवस होऊनही अदयापही सरकारला या विषयाचे गांर्भिय नसल्याची टीका दरेकर यांनी केली.

या प्रसंगी माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या तरुणांना कायद्यातील तरतुदीनुसार नियुक्त्या मिळाल्या पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा विधिमंडळाने एकमताने समंत केला होता. न्यायालयानेही अदयापही हा कायदा अमान्य केलेला नाही. त्यामुळे या कायद्यातील तरतुदीनुसार उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांना नियुक्ती मिळाल्या पाहिजे.

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा विधीमंडळाने समंत केला त्याप्रक्रियेमध्ये आपण स्वत: होतो, त्यामुळे या कायदयातील कुठल्याही तरतुदी रद्द केल्या नाहीत. त्यामुळे त्या तरतुदीप्रमाणे सरकारने कायर्वाही करणे आवश्यक आहे. हा कायदा उच्च न्यायालयाने वैध ठरविला आहे आणि सर्वोच्च न्यायालयनेही या कायदयातील तरतुदींना कोणतीही स्थगिती दिलेली नाही, त्यामुळे मराठा समाजाच्या तरुण तरुणींचा हा प्रश्न सोडविला जाऊ शकतो. असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मराठा समाजाच्या तरुणांना न्याय न देता महाआघाडी सरकारने या मराठा समाजाला वा-यावर सोडल्याची परिस्थिती आहे. परंतु या समाजाच्या तरुणांना न्याय देण्यासाठी मी विधान सभेत आणि प्रविण दरेकार विधान परिषदेत लावून धरु. तसेच या विषयामध्ये सरकारला आमच्या मदतीची आवश्यकता असेल, तर आम्ही मदत करावयाला तयार आहोत. हा कोणत्या एका पक्षाचा विषय नाही, पण तरीही सरकार या प्रश्नावर उदासिन असल्याची बाब निश्चितच दुर्देवी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!