प्रवरा, गोदावरी दुथडी, भिमेला पूर

0
भिमा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
अहमदनगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा, मुळा, दारणा धरणांच्या पाणलोटात जोरदार पाऊस सुरू असल्याने सर्व धरणांमधून ओव्हरफ्लो सोडण्यात आल्याने गोदावरी, प्रवरा नदी दुथडी वाहु लागली आहे. दोन्ही नदींच्या पाणी पातळीत वाढ होत असून कळसचा छोटा पूल पाण्याखाली गेला आहे.
त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशियांना सावधानेचा इशारा देण्यात आला आहे. भीमा नदीलाही मोठा पूर आला असून दौंडच्या पुलाजवळ या नदीत 73045 क्युसेकने पाणी सुरू होते. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
मुळा धरणाच्या पाणलोटातही पाऊस वाढल्याने हे धरण आज 84 टक्के भरणार असून धरणाच्या दिशेने सायंकाळी 6592 क्युसेकने सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू असल्याने दारणा, गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने गोदावरी नदी सायंकाळी 30909 क्युसेकने वाहती होती.
  • कळसचा छोटा पूल पाण्याखाली

अकोले, कोतूळ (प्रतिनिधी)-भंडारदरा पाणलोटक्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने भंडारदरा व निळवंडे दोन्ही धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढविण्यात आला असून अकोलेतील कळसचा छोटा पूल पाण्याखाली गेला आहे. पाणी पातळी वाढत असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पाणलोटात पाऊस असल्याने काल सकाळी कोतूळ येथून मुळा धरणाकडे नदीपात्रातून 11हजार 152 क्युसेस ने तर सायंकाळी सहा वाजता 6 हजार 792 कुसेस ने मुळा धरणाकडे आवक सुरु होती. आज या धरणातील पाणीसाठा 84 टक्के होणार आहे. त्यामुळे मुळा धरण भरण्याची आशा उंचावली आहे
भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पावसाने पुन्हा जोरदार बरसण्यास सुरुवात केली असल्याने आज सकाळी 10 वाजेपासून भंडारदरा धरणातून 9017 क्युसेक्स तर निळवंडेतुन 15228 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आल्यावर दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्यावर 3 वाजता भंडारदरातुन 8323 तर निळवंडेतुन 10666 क्युसेक्स करण्यात आला तर सायंकाळी पाच वाजता पुन्हा वाढवून भंडारदरातुन अंब्रेलाफॉल, टनेल, स्पीलवे गेटद्वारे 9017 क्युसेक्स तर निळवंडेतुन 15200 क्युसेक्स विसर्ग व वाकीतुन 2199 क्युसेक्स ने ओहरप्लो सुरु आहे.तर पाणीसाठयात होणार्‍या आवकेनुसार विसर्ग कमी अधिक प्रमाणात नदीपात्रात सोडण्यात येईल असे जलसंपदा विभागाचे शाखाधिकारी राजेंद्र कांबळे यांनी सांगितले तर धरण पातळीवर तुकाराम वसईकर, प्रकाश चव्हाण, बाळासाहेब लोहगावकर, तुकाराम घोरपडे, नामदेव भोईर, अर्जुन धनगर, सुरेश हंबीर, दत्तात्रय पाबळकर, मंगळा मधे, अंतु सगभोर लक्ष ठेवून प्रत्येक तासाला मोजदाद घेऊन खबरदारी बाळगून आहेत.
मुळा धरण पाणलोट क्षेत्रात परवापासून पुन्हा पाऊस सुरु झाला आहे कालही दिसभर पाणलोट क्षेत्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या
पावसाला पुन्हा सुरवात झाल्याने आदिवासी भागातील भात पिकाला त्याचा फायदा होणार आहे मुळा नदी पाणलोटात आंबीत, पाचनई कुमशेत , जानेवाडी ,या भागात घाट माथ्यावर दिवसभर जोरदार सरी कोसळत होत्या े मुंबईत काल झालेल्या जलप्रलय या नंतर मंगळवारी रात्री पासून सह्याद्रीच्या पर्वत रांगात पावसाचा जोर वाढला आहे यामुळे मुळा नदी चा प्रवाह वाढला आहे
नगर जिल्याची जीवन दायनी असणारी सकाळी मुळा नदी पुन्हा प्रवाहित झाली आहे. काल सकाळी कोतूळ येथून मुळा धरणाकडे नदीपात्रातून 11हजार 152 क्युसेस ने तर सायंकाळी सहा वाजता 6 हजार 792 कुसेस ने मुळा धरणाकडे आवक सुरु होती यामुळे मुळा धरण भरण्याची आशा उंचावली आहे आज बुधवारी सायंकाळी मुळा धरणाचा साठा 21 हजार680 दशलक्ष घनफूटावर गेला. धरणातील पाणी साठा आज 84 टक्यांवर पोहचणार आहे. सार्वजनिक गणेशोत्ववात पावसाचे आगमन झाल्याने गणेश भक्तही आनंदी झाले आहे.

  • गोदावरीत 31000 क्युसेकने पाणी

अस्तगाव (वार्ताहर)- नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर मंगळवारी रात्री पडलेल्या जोरदार पावसाने धरणांमध्ये पाण्याची आवक वाढल्याने धरणांमधील विसर्ग वाढविण्यात आले. त्यामुळे नंादुरमधमेश्‍वर बंधार्‍यातून गोदवरी नदीला 31 हजार क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे.
दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल सकाळी 6 वाजता मागील 24 तासांत दारणाच्या भिंतीजवळ 12,घोटी 63, इगतपुरी 71, भावली 66 मिमी पावसाची नोंद झाली. भावलीतील विसर्गही दाखल होत असल्याने दारणात 405 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले आहे. त्यामुळे दारणातून काल सकाळी 6 वाजता 8165 क्युसेकने विसर्ग सुरु होता. तो काल दिवभर तसाच टिकून होता. गंगापूर धरणाच्या परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावल्याने 2685 क्युसेकने सुरु असलेला विसर्ग काल दुपारी 3 वाजता 5229 क्युसेक इतका वाढविण्यात आला. कडवा धरणातून 1484 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे. पालखेड धरण क्षेत्रातही दमदार पाऊस झाल्याने काल सकाळी या धरणातून 5806 क्युसेकने सुरु असलेला विसर्ग काल सायंकाळी वाढवत तो 8472 क्युसेक करण्यात आला. वालदेवीतुन 1050, तर आळंदीतुन 687 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत आहे. या धरणांचे पाणी मधमेश्‍वर बंधार्‍यात दाखल होत असल्याने गोदावरीत काल सकाळी आवक जसजशी वाढेल तसा विसर्ग वाढवत नेला. काल सकाळी 6 वाजता 12620 क्युसेकने गोदावरी पात्रात पाणी पडत होते. दुपारी 12 वाजता 15575 क्युसेक इतका विसर्ग वाढविण्यात आला. 3 वाजता 28655 क्युसेक इतका करण्यात आला. सायंकाळी 5 वाजता 30,909 क्युसेकवर हा विसर्ग नेण्यात आला. आवक पाहता हा विसर्ग रात्रभर टिकून राहाणार होता. हे पाणी जायकवाडीकडे वेगाने वाहत आहे.
जायकवाडी 72.46 टक्के
जायकवाडी प्रकल्पात गोदावरीतून पाण्याची आवक होत आहे. प्रवरेचा विसर्गही दाखल होत आहे. काल सायंकाळी 5 वाजता प्रवरेतून नेवासा येथे 3773 क्युसेकने आवक होत होती. यावेळी भंडारदरा धरणातून 9017 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. खाली निळवंडेतून 17342 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. तर ओझर बंधार्‍याच्या ठिकाणी 9833 क्युसेकने पाणी प्रवरेला मिळत होते. काल सायंकाळी 6 च्या आकडेवारी नुसार जायकवाडी धरणात उपयुक्त पाणी साठा 72.46 टक्के इतका झाला होता. हे पाणी 55.5 टीएमसी इतके आहे. तर मृतसह एकूण साठा 81.60 टीएमसी इतका झाला आहे. काल सायंकाळी 6 वाजता या धरणात वरील धरणातून 20 हजार 688 क्युसेकने पाण्याची आवक होत होती.

  • भिमेतून 73045 क्युसेकने विसर्ग

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- पाणलोटात पाऊस सुरू असल्याने भीमा नदी नदीला पूर आला आहे. दौंडजवळील पुलानजीक या नदीतून 73045 क्युसेकने पाणी वाहत होते. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
श्रीगोंदा तालुक्यात मागील चार वर्षापासून दुष्काळी परिस्थिती होती . चालू मान्सून हंगामात सुद्धा उशिरा का होईना दमदार हजेरी लावली आहे तालुक्याच्या काही भागातून वाहणार्‍या घाडे, भीमा, सीना, हंगा यापैकी भीमा नदीच्या वरील भागात जोरदार पाऊस असल्याने भीमा नदीला पूर आला आहे.घोडचे आवर्तन सोडण्यात आले आहे. नदीला पाणी आल्याने या नदीच्या पट्यातील पिकाना जीवदान मिळणार असल्याने उसाची लागवड शेतकरी करण्यास सुरुवात केली आहे. भीमातील विसर्ग वाढला आर्वी बेटाचा संपर्क सुरळीत आहे .या बेटावर जाण्या येण्याचा साठी नदीपात्रात जाण्यासाठी बोटींची सुविधा आणि आपातकालीन यंत्रणा सज्ज आहे .

LEAVE A REPLY

*