दारणा पाठोपाठ गंगापूर, कडवातूनही विसर्ग

0

विसर्ग: दारणा 10780, गंगापूर 2080, तर कडवातून 1345 क्युसेक, गोदावरीत 15848 क्युसेकने विसर्ग

अस्तगाव (वार्ताहर)-दारणा धरणाच्या पाठोपाठ काल सकाळी 7 वाजता गंगापूर, कडवा या धरणातूनही विसर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. दारणातून काल सायंकाळी 6 वाजता 10,780 क्युसेकने, गंगापूर 2080 क्युसेक ने तर कडवा चा विसर्ग 1345 क्युसेकने करण्यात येत आहे. खाली नांदुरमधमेश्‍वर बंधार्‍यातून गोदावरी नदीत जायकवाडीच्या दिशेने 15, 848 क्युसेकने करण्यात येत आहे. या बंधार्‍यातून गोदावरीत काल सकाळी 6 वाजेपर्यंत आतापर्यंत एकुण पावणे पाच टीएमसी पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहुन गेले आहे.

काल दिवभर दारणा तसेच अन्य धरणांच्या पाणलोटात मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या सरी बरसत होत्या. ओढे तसेच छोट्या नद्या, व धबधब्यांचे पाणी धरणांमध्ये दाखल होत असल्याने नवीन पाण्याची आवक पाऊस हलका असला तरी सुरुच आहे. दारणा धरणातील साठा 76.39 टक्क्यांवर आला आहे. 7149 दलघफू क्षमतेच्या या धरणात 5461 दलघफू पाणीसाठा आहे.

या धरणात काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 691 दलघफू म्हणजेच अर्धा टीएमसीहुन अधिक पाणी नव्याने या धरणात दाखल झाले आहे. त्यामुळे विसर्ग काहीसा वाढविण्यात आला आहे. काल सकाळी 6 वाजेपासून या धरणातून 10780 क्युसेकने पाणी नांदुरमधमेश्‍वर च्या दिशेने वाहत आहे. या धरणाच्या भिंतीजवळ काल सकाळी 24, पाणलोटातील घोटी येथे 80, इगतपुरी येथे 98 मिमी असा पाऊस नोंदला गेला. शेजारील भावली धरणाचा साठा 83 टक्क्यांवर पोहचला आहे.

1434 दलघफू क्षमतेच्या या धरणात 1194 दलघफू पाणीसाठा झाला आहे. या धरणाच्या भिंतीजवळ काल सकाळी संपलेल्या 24 तासांत 98 मिमी पावसाची नोंद झाली. दारणातून आता पर्यंत 1787 दलघफू पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. हे पाणी पावणे दोन टीएमसी इतके आहे.

गंगापूर धरण 74.6 टक्के भरल्यानंतर काल सकाळी 7 वाजता या धरणातून सुरुवातीला 832 क्युसेकने विसर्ग गोदावरीत नांदुरमधमेश्‍वर बंधार्‍याच्या दिशेने करण्यात येऊ लागला. त्यांनतर 8 वाजता तो वाढवून 2080 क्युसेक इतका करण्यात आला. तो काल उशीरापर्यंत तसाच टिकून होता. 5630 क्षमतेच्या या धरणात 4201 दलघफू पाणीसाठा आहे. काल सकाळी या धरणाच्या पाणलोटात अंबोली येथे 88, त्र्यंबक येथे 66, नाशिक येथे 24, या धरणाच्या भिंतीजवळ 55 मिमी पावसाची नोंद झाली.

कडवा प्रकल्पात 71.98 टक्के पाणीसाठा झाल्याने पुन्हा एकदा त्यातून नांदुरमधमेश्‍वर च्या दिशेने शनिवारी रात्री 10 वाजता सुरुवातीला 829 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आला. त्यानंतर 12 वाजता 1000 क्युसेक करण्यात आला. काल सकाळी रविवारी 1345 क्युसेक इतका हा विसर्ग करण्यात आला.

नांदुमधमेश्‍वर बंधार्‍यात या तिन्ही धरणांचे पाणी दाखल होत आहे. या शिवाय नाशिक परिसरातील पावसाचे पाणी ओढे नाले यांच्या माध्यमातून या बंधार्‍यात दाखल होत असल्याने गोदावरीत या बंधार्‍यातून 15 हजार 848 क्युसेकने विसर्ग काल सायंकाळी 6 वाजता सुरु होता. शनिवारी रात्री 22384 क्युसेक वरुन तो 14234 क्युसेक करण्यात आला होता.

मात्र पुन्हा काल सायंकाळी त्या वाढ करुन तो 15,848 इतका स्थिर ठेवण्यात आला आहे. या बंधार्‍यातून गोदावरीत काल सकाळी 6 वाजे पर्यंत एकूण 4799 दलघफू म्हणजेच पावणे पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

अन्य धरणांचे पाणी साठे असे- मुकणे 24.16 टक्के, काश्यपी 57.07 टक्के, वालदेवी56.57 टक्के, गौतमी गोदावरी 43.38 टक्के. पाऊस मिमीमध्ये पुढील प्रमाणे- कडवा 25, मुकणे 35, काश्यपी 35, गौतमी गोदावरी 87, तसेच कोपरगाव 1, कोळगाव 5, सोनेवाडी 3, शिडी 7.अन्यत्र पावसाने विश्रांती घेतली आहे.

जायकवाडीत 20 टक्के  उपयुक्त साठा जायकवाडीत 20 टक्के  उपयुक्त साठा गोदावरीचे पाणी जायकवाडी जलाशयात सामावत असल्याने काल सायंकाळी 6 च्या आकडेवारी नुसार या जलाशयाचा उपयुक्त साठा वाढत आहे. काल या धरणात 20.18 टक्के उपयुक्त साठा झाला आहे. 15 हजार 472 दलघफू उपयुक्त साठा झाला आहे. म्हणजचे जवळपास साडेपंधरा टीएमसी पाणी उपयुक्त साठा तयार झाला आहे. तर मृतसह एकुण साठा 41.5 टीएमसी इतका झाला आहे. या धरणात काल सायंकाळी 6 वाजता 18 हजार 018 क्युसेकने पाण्याची आवक गोदावरीतून होत होती.

 

LEAVE A REPLY

*