घाटघरला अडीच इंच पाऊस

0

मुळा पाणलोटात पावसाचा जोर नाही

भंडारदरा (वार्ताहर) – घाटघर आणि रतनवाडीत पावसाचा जोर वाढल्याने 24 तासांत भंडारदरा धरणात 175 दलघफू पाणीसाठा वाढला आहे. त्यात 52 दलघफू पाण्याचा वापर झाला तर 123 दलघफू पाणी धरणात जमा झाले. त्यामुळे सायंकाळी पाणीसाठा 2285 दलघफू झाला होता. बुधवारीही पावसाचा जोर टिकून होता.
दोन दिवस पावसाचा वेग मंदावला होता. मंगळवारी दिवसभर रिपरिप सुरू होती. बुधवारी पावसाचा जोर वाढल्याने डोंगर दर्‍यांवरील धबधबे पुन्हा सक्रिय झाले असून ओढे नाले खळखळू लागले आहेत.

भंडारदरा पाऊस (मिमी)

भंडारदरा 18, भंडारदरा 18, घाटघर 62, पांजरे 29, रतनवाडी 44, वाकी 17

दारणात 114 दलघफू नवीन पाणी

अस्तगाव (वार्ताहर)- काल दिवसभर दारणाच्या पाणलोटात पावसाची रिपरिप सुरुच होती. घोटी, इगतपुरी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने या परिसरातील घाटमाथ्यांवरील पाणी खळखळत दारणाकडे धावत असल्याने या धरणात नवीन पाण्याची आवक होत आहे. भावली प्रकल्पातही पातळी वाढू लागली आहे.

24 तासांत दारणात 114 दशलक्षघनफुट, गंगापूरमध्ये 22 तर भावलीत 36 दशलक्ष घनफूट पाणी नव्याने दाखल झाले आहे. काल बुधवारी पावसाची संततधार दारणाच्या पाणलोटात सुरुच होती. त्यामुळे नवीन पाण्याची आवक होत असल्याने दारणाचा साठा हालता आहे. 7149 क्षमतेच्या या धरणात 619 दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे.

या धरणात 8.66 टक्के पाणीसाठा झाला आहे. 24 तासांत या धरणात 114 दशलक्ष घनफूट पाणी नव्याने दाखल झाले होते. काल बुधवारी संकाळी संपलेल्या 24 तासात दारणाच्या भिंतीजवळ 33 मिमी पावसाची नोंद झाली. घोटी येथे 85 मिमी, इगतपुरी येथे 65 मिमी पावसाची नोंद झाली आहे. शेजारील भावली धरणाच्या परिसरात 78 मिमी पावसाची नोंद झाली. 1434 क्षमतेच्या या धरणात 242 दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. या धरणात 24 तासात 36 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे.

गंगापूर धरणाच्या भिंतीजवळ काल सकाळी संपलेल्या 24 तासात 35 मिमी पावसाची नोंद झाली. त्रंबक येथे 50 मिमी, अंबोली 42 मिमी असा पाऊस नोंदला गेला. 5630 क्षमतेच्या या धरणात 1286 दशलक्ष घनफूट (22.84 टक्के) पाणीसाठा झाला आहे. 24 तासात 22 दशलक्ष घनफूट पाण्याची नव्याने आवक झाली.
अन्य धरणांच्या परिसरात पडलेला पाऊस असा- पाऊस मिमी मध्ये- कडवा 17, काश्यपी 14, गौतमी 23, तसेच नाशिक 23, सोमठाणा 11, चितळी 3, असा पाऊस नोंदला गेला. अन्यत्र पाऊस नाही.

LEAVE A REPLY

*