पावसाचा धुमाकूळ : मुळा, प्रवरा, गोदावरी नद्यांतील पाणी वाढले

0
नद्यांचे विसर्ग (क्युसेक)
अहमदनगर (प्रतिनिधी) – गत आठवड्यापासून सर्व धरणांच्या पाणलोटात आणि लाभक्षेत्रात मुसळधार पाऊस होत असल्याने जिल्हा पाणीमय झाला आहे.
सातत्याने होणार्‍या पावसाच्या मार्‍यामुळे मात्र सोयाबीन, कपाशी व अन्य पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
मुळा, भंडारदरा, निळवंडे व अन्य धरणे तुडुंब झाली आहेत. त्यामुळे नवीन येणारे पाणी नदीत सोडण्यात येत असल्याने नदीपात्रातील पाणीही वाढत असून नदीकाठची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
कोपरगाव तालुक्यात बंधारा फुटल्याने नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी शेतात तळे साचल्याने मोठी हानी झाली आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.

रुग्णांच्या संख्येत वाढ  –
अनेक नागरिकांनी नळाच्या पाण्यासाठी खड्डे घेतले असून त्याला तोट्या बसविलेल्या नाहीत. त्यात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने हे खराब पाणी नळाद्वारे मेन पाईपलाईनमध्ये जात असल्याने दूषित पाणी पिण्यात येत आहे. त्यामुळे अनेकांच्या पोटाच्या तक्रारी वाढल्या आहेत. तसेच ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण रूग्णालयांमध्ये गर्दी करून लागले आहेत. विजेच्या लंपडावामुळे डासांच्या उपद्रव वाढला आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. 

नद्यांचे विसर्ग (क्युसेक) 

गोदावरी 31322

भीमा (दौंड) 17185

प्रवरा (ओझर) 3910

मुळा 6000

घोड 8400

 

LEAVE A REPLY

*