निफाडला पावसाची हजेरी

0
निफाड| दि.९ प्रतिनिधी- मृग नक्षत्राच्या दुसर्‍या दिवशी पावसाने तालुक्यात जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले तर रस्त्यावर आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे रहदारी काहीशी विस्कळीत झाली होती. रात्री उशिरापर्यंत हा पाऊस बरसतच होता.

शुक्रवारी नैताळे, शिवरे फाटा, नांदूरमध्यमेश्‍वर, भरवस, वाहेगाव, गोंदेगाव, दिंडोरी, सारोळेखुर्द परिसरात पावसाने दोन तास जोरदार हजेरी लावली. नैताळे ते शिवरे फाटा दरम्यान शेतात पाणी साचले होते. तर खडकमाळेगांव, उगाव, वनसगांव, देवपुर, पंचकेश्‍वर, सोनेवाडी, उगाव, कोठुरे, भरवस, वाहेगाव, शिवरे, श्रीरामनगर, विंचूर, रुई, देवगाव आदी परिसरात देखील रात्री उशिरा विजेच्या कडकडाटात जोराच्या पावसाने हजेरी लावली.

या पावसामुळे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास येथील आठवडे बाजारातील व्यावसायिक व ग्राहकांची तारांबळ उडाली होती. तालुक्याच्या अनेक भागात शेतात पाणी साचले तर अनेक रस्ते जलमय झाले होते.

LEAVE A REPLY

*