जिल्ह्यात पावसाचा दणका सुरूच

0

शेतकरी चिंतेत – 

अहमदनगर (प्रतिनिधी)- गत चारपाच दिवसांपासून हस्त नक्षत्राच्या पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून काल नगर, राहुरी, संगमनेर, अकोले ,श्रीरामपूर शहर व तालुक्यांच्या काही भागात हजेरी लावली. अन्य तालुक्यातही मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे.
शेतात अगोदरच पाणी साचलेले असताना आणखी पाऊस झाल्याने शेतकर्‍यांपुढील अडचणी वाढल्या आहेत. काही ठिकाणी कापसाची वेचणी अजून झालेली नाही. तो कापूसही भिजला आहे. सोयाबीन काढणीचे काम सुरू असतानाच त्यातही या पावसाने खो घातला आहे.
भंडारदरा वार्ताहराने कळविले की, सायंकाळी 7 वाजेपासून पाणलोटात रिपरिप सुरू आहे. त्यामुळे धरणात येणारे पाणी निळवंडे धरणात सोडण्यात येत आहे.

शाळेभोवती पाणी – 

तळेगाव दिघे (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे सोमवारी सायंकाळच्या सुमारास जोरदार पावसाने एकतासाहून अधिकवेळ हजेरी लावली. धो-धो पाऊस सुरू असल्याने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेभोवती पाण्याचे मोठे तळे साचले. त्यामुळे पाण्यातूनच चिमुकल्या विद्यार्थ्यांना वाट शोधावी लागली.
जोरदार पावसाच्या हजेरीने सर्वत्र पाणीच पाणी साचले. यावेळी शिक्षक विद्यार्थ्यांसमवेत जीव मुठीत धरून थांबले होते. तळेगाव दिघे सहित परिसरात सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाचे जोरदार हजेरी लावली. प्राथमिक शाळा सुटण्यापूर्वी पाऊस सुरू झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना पाऊस उघडण्याची प्रतीक्षा करीत शाळेतच थांबावे लागले. पाऊस थोडा कमी झाल्यावर काही विद्यार्थ्यांनी पाण्यातून वाट शोधत घरचा रस्ता धरला.

LEAVE A REPLY

*