तिन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस गायब

0

जूनमध्ये पावसाची सरासरीच्या तुलनेत 33. 45 टक्के नोंद

, धरणांनी गाठला तळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्यात मान्सूनपूर्व व मान्सून दाखल झाल्यानंतर चांगला पाऊस झाला आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत 33.45 टक्के पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षाच्या जून महिन्यात केवळ सात टक्केच पावसाची नोंद झाली होती. मागील तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने आता खरिपच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. मात्र, पाऊस थांबल्याने शेतकर्‍यांची चिंता पुन्हा वाढली आहे. सोसाट्याचा वारा कधी थांबणार अशी विचारणा शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.
गेल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात मान्सूनपूर्व वार्षिक सरासरीच्या तुलनेत 20 टक्के पावसाची नोंद झाली होती. तर मागील आठ दिवसांत मान्सूनचा पाऊस सुरू झाला असल्याने पावसाची सरासरी 33. 45 टक्क्यांपर्यंत गेली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 497 मिलिमीटर आहे. तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. केवळ राहाता आणि राहुरी तालुक्यांत सोमवार सकाळपर्यंत पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.
राहाता तालुक्यात सर्वाधिक 74 टक्के, नेवासे तालुक्यात 64 टक्के, कर्जत तालुक्यात 52 टक्के, पाथर्डी तालुक्यात 45 टक्के नगर तालुक्यात 41 टक्के पाऊस झाला आहे. अकोले वगळता इतर तालुक्यांमध्ये 20 ते 35 टक्कांच्या आसपास पाऊस झाला आहे. तीन दिवसांपासून पाऊस थांबला असल्याने शेतकर्‍यांनी खरिपाच्या पेरण्या सुरू केल्या आहेत.

तालुकानिहाय पाऊस
(20 जूनपर्यंत)
अकोले 11, संगमनेर 18, कोपरगाव 21, श्रीरामपूर 32, नेवासे 64, राहाता 74, नगर 41, शेवगाव 26, पाथर्डी 45, पारनेर 36, कर्जत 51, जामखेड 28. 

LEAVE A REPLY

*