मुळा : 10 हजार दलघफू

0

डिंभे निम्मे, भंडारदरात धरणात  62 टक्के पाणीसाठा

कोतूळ, भंडारदरा (वार्ताहर) – नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा आणि भंडारदरा पाणलोटात अद्यापही पाऊस टिकून असल्याने दोन्ही धरणांमध्ये पाण्याची चांगली आवक होत आहे. त्यामुळे मुळातील पाणीसाठा 10 हजार दशलक्ष घनफुटावर पोहचला आहे. तर भंडारदरातील साठा 60 टक्क्यांच्या पुढे सरकला आहे. निळवंडेतही 2573 दलघफू पाणी आहे.

शुक्रवारी धो धो पाऊस झाल्याने भंडारदरात पाण्याची विक्रमी आवक झाली. तर मुळा नदीला छोटा पूर आल्याने मुळा धरणातही जोरदार आवक झाली. त्यामुळे या धरणांमधील पाणीसाठा तासागणिक वाढत आहे. शनिवारीही पाणलोटातील घाटघर, पांजरे आणि रतनवाडीत पावसाचे प्रमाण टिकून होते. परिणामी भंडारदरात गत बारा तासांत 173 दलघफू पाणी दाखल झाले. वाकीतून ओव्हरफ्लो 1022 क्युसेकने सुरू असल्याने निळवंडे धरणतही 30 टक्के झाले आहे.

मुळा पाणलोटातील हरिश्‍चंद्र गड, पाचनइर, आंबित व अन्य भागात पाऊस टिकून असल्याने मुळा नदीतील विर्से 8373 क्युसेकने सुरू आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 9539 दलघफू होता. त्यात बारा तासांत 448 दलघफू नवीन पाण्याची भर पडली. त्यामुळे सायंकाळी हा साठा 9987 दलघफू झाला होता. रात्री हा पाणीसाठा 10 हजार दलघफूच्या पुढे सरकला. पाण्याची आवक सुरू असल्याने हे धरणातील पाणीसाठा आज 40 टक्क्यांवर जाणार आहे.

 

LEAVE A REPLY

*