जिल्ह्यात सरासरीच्या टक्केवारीने दीड शतक गाठले

0

कोपरगावची सरासरीही 116 टक्क्यांवर

अहमदनगर (प्रतिनिधी) – गत आठवड्यापासून नगर जिल्ह्यात परतीचा पाऊस सर्वदूर होत असल्याने यंदा पावसाच्या सरासरीच्या टक्केवारीने दीड शतकाच्या पुढे (153 टक्के) बाजी मारली आहे. गेल्यावर्षी ही आकडेवारी 136 टक्के होती.
विशेष म्हणजे काल मंगळवारी जोरदार झालेल्या पावसामुळे या तालुक्याची सरासरी 116 टक्क्यांवर पोहचली आहे. अकोलेतील सरासरी टक्केवारी 203 असून राहात्याची टक्केवारी 183 टक्क्यांवर पोहचली आहे. अन्य तालुक्यांनीही शतकाच्या पुढे बाजी मारली असल्याने काही तालुक्यांत यंदा ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
मुळा, भंडारदरा, निळवंडे, आढळा, मांडओहळ, सीना, खैरी ही धरण पाण्यानं तुडूंब आहेत. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर आणि कर्जतला वरदान असलेला कुकडी प्रकल्प घोड धरणही 100 टक्के भरले आहे. गत आठवड्यापासून जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. नाशिकमध्ये पाणी कोसळत असल्याने गोदावरी नदीला कधी पूर येत असून सध्या ही नदी दुथडी आहे. मुळा, प्रवरा नदीतील विसर्गही कमी अधिक होत आहे.

भंडारदरात दोन इंच पाऊस –
भंडारदरा (वार्ताहर)- काही दिवसांपासून पाऊस कोसळत असल्याने भंडारदरा धरणात पाण्याची आवक होत आहे.पण हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने ते पाणी खाली सोडण्यात येत आहे. काल सायंकाळी संपलेल्या 24 तासांत 49 मिमी पावसाची नोंद झाली. हे पाणी निळवंडेत जमा होत असल्याने हेही धरण पूर्ण भरलेले असल्याने 3910 क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे खाली बंधारे ओसंडून वाहत असून काही पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावले आहे. 24 तासात पडलेला पाऊस मिमीमध्ये घाटघर- 38, पांजरे 47, रतनवाडी-55, वाकी-64.

कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहुरीत धो-धो पाऊस – 
मंगळवारी कोपरगाव शहर व परिसरात धो-धो पाऊस झाला. या पावसाची नोंद 92 मिमी झाली आहे.दहिगाव बोलका येथेही 67 मिमी पाऊस पडला. श्रीरामपूर शहर आणि परिसर तसेच राहुरीत मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. श्रीरामपुरात 67 तर राहुरीत 60 मिमी पाऊस पडला.
येथे झाला अर्धा इंचापेक्षा अधिक पाऊस
तळेगाव 63, पेडगाव 66, भांबोरा 102, उंदिरगाव54,पळशी 68 मिमी.

 

LEAVE A REPLY

*