Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मुंबई-आग्रा महामार्ग जलमय; अनेक वाहने अडकली; स्थानकांत प्रवाशांची गर्दी

Share

इगतपुरी | वार्ताहर

इगतपुरी शहरात सकाळ पासुनच दिवसभर जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. सायंकाळच्या सुमारास वाडीव-हे व अस्वली स्टेशन परीसरात ढगफुटी सारखी अतिवृष्टी झाल्याने पावसाचे थेट गुडघाभर पाणी मुंबई आग्रा महामार्गावर आल्याने काही काळ महामार्गावरील वाहतुक ठप्प झाली होती.

तर अंबड, सातपुर परीसरातील कंपनीतील काम करणारे कामगार वर्ग व शालेय शिक्षणासाठी विद्यार्थी विद्यार्थीनींचे इगतपुरीला येण्यासाठी खुप हाल झाले. अशीच परीस्थीती अस्वली स्टेशन परीसरातील रेल्वे मार्गावर झाल्याने पावसाचे थेट पाणी मुंबईला जाणाऱ्या व नाशिकहुन येणाऱ्या रुळावर आल्याने रेल्वे सेवाही ठप्प झाली होती.

यामुळे नाशिहुन येणारी तपोवन एक्सप्रेस आदी गाड्या काही काळासाठी देवळाली नाशिक रेल्वे स्थानकावर थांबवुन ठेवल्या होत्या. तसेच नाशिकला जाणारी मनमाड शटल एक्सप्रेस, हुतात्मा पुणे भुसावळ एक्सप्रेस इगतपुरी रेल्वे स्थानकावर रद्द करण्यात आली तर नागपुर सेवाग्राम एक्सप्रेस, राजधानी एक्सप्रेस इगतपुरी

कसारा दरम्यान थांबवण्यात आल्या. तसेच मुंबई मनमाड पंचवटी एक्सप्रेस, राज्यराणी एक्सप्रेस आदी गाडया आसनगांव रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आल्या. तर मुंबईला जाणाऱ्या गाड्या देवळाली, लहावीत, अस्वली स्थानकाजवळ रत्नागिरी एक्सप्रेस उभी, तपोवन एक्सप्रेस, लखनऊ एक्सप्रेस, कामायनी एक्सप्रेस व हरिद्वार एक्सप्रेस या गाड्या घोटी ते नाशिक दरम्याम उभ्या केल्या होत्या.

या सर्व गाड्या रेल्वे स्थानकावर थांबवुन ठेवल्याने व काही गाड्या रद्द केल्याने रेल्वे प्रवाशांचे आतोनात हाल झाले. रात्री नऊ वाजे पर्यंत सुध्दा रेल्वे वाहतुक पुर्णपणे ठप्प होती. तर इगतपुरी रेल्वे स्थानकातुन सायंकाळी साडे पाच वाजेपासून नाशिककडे जाणारी गोदावरी एक्सप्रेस घोटी ते अस्वली स्टेशन दरम्यान अडकले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!