Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोरोनानंतर नगरकरांवर अस्मानी संकट

Share

अवकाळी पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान
अहमदनगर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूने नगरकरांची झोप उडवलेली असताना आता अस्मानी संकट कोसळले आहे. आज वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने काही वेळ नगरकरांची दाणादाण उडवून दिली. गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, खरबूज आदी पीकांचे मोठ्या प्रमाणावर नूकसान झाले आहे. तर वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. या बदलत्या वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होणार आहे. सर्दी, खोकला असे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. दरम्यान वादळामुळे वीजेच्या तारा तुटल्याने श्रीरामपूरसह नगर उत्तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अंधाराचे साम्राज्य होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!