Type to search

Featured सार्वमत

यंदा सरासरीच्या 93 टक्के पाऊस; मुळा धरण 100 टक्के भरणार

Share

राहुरी विद्यापीठाचे हवामान शास्त्रज्ञ प्रा. मोहनराव देठे यांचा अंदाज

देवळाली प्रवरा (वार्ताहर)- यंदा सरासरीच्या 93 टक्के पाऊस होईल. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये चांगला पाऊस होऊन मुळा धरण भरणार असल्याचा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील हवामानशास्त्र विभाग प्रमुख प्रा. मोहनराव देठे यांनी व्यक्त केला आहे. मात्र, मे मध्ये सुरूवातीलाच अवकाळी पाऊस झाला तर त्याचा पावसावर विपरित परिणाम होऊ शकतो, अशी शक्यताही प्रा. देठे यांनी व्यक्त केली.

यंदाचा पावसाळा कसा राहील? याबाबत बोलताना प्रा. देठे यांनी सांगितले, यंदा गरजेपुरता पाऊस निश्चित पडणार असून सरासरीच्या 93 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. राहुरी तालुक्याला 520 मिमी. पावसाची गरज असते. परंतु मागीलवर्षी एकदम निच्चांकी म्हणजे फक्त 292 मिमी. पाऊस पडल्याने तालुक्याला दुष्काळाचा सामना करावा लागला.
यंदा तापमान, हवेतील आर्द्रता, वार्‍याची दिशा व वेग पाहता समाधानकारक पाऊस होण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये मान्सून 7 जूनला दाखल होतो. परंतु आपल्याकडे मान्सून येण्यास वेळ लागत असल्याने आपल्याकडे 25 जूनपासून मान्सून सुरू होतो. यंदा प्रथमच दिवसाचे कमाल तपमान 28 एप्रिल रोजी 43 व किमान तपमान 249 असे अतिउच्च होते. मे महिन्यात अशीच स्थिती राहिली तर तपमान 44 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मात्र, वाढलेल्या तपमानाचा पावसावर चांगला परिणाम होणार आहे.

दरवर्षी 24 किंवा 25 मे ला रोहिणी नक्षत्र सुरू होते. यामध्ये पाऊस कसा राहील? याबाबत माहिती देताना प्रा. देठे म्हणाले, गेल्या 21 वर्षांचा पावसाचा अंदाज घेतला असता यंदाही रोहिणी कमी बरसण्याची शक्यता आहे. सन 2004 मध्ये मे महिन्यात 196 मिमी. पाऊस झाला होता. हा अपवाद वगळता गेल्या 21 वर्षात मेमध्ये पाऊस कमीच झाला आहे.

परंतु यंदा जूनमध्ये 30 टक्के पावसाची सरासरी शक्यता दिसत आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये चांगला पाऊस होणार असून सरासरीच्या 93 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. राहुरी तालुक्याला सरासरी 520 मिमी. पावसाची गरज असते. यंदा ही गरज जवळजवळ पूर्ण होण्याची शक्यता आहे.परतीचा मान्सून देखील चांगला बरसण्याची शक्यता आहे. गेल्या 21 वर्षाच्या हवामानाच्या माहितीवरून वरील चार महिन्यांत चांगला पाऊस होणे अपेक्षित आहे.

त्यामुळे मुळा धरण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे. सध्या दिवसभरात 11 तास सूर्यप्रकाश भेटतो. वार्‍याचा वेग ताशी 5 किमी असून हवेतील आर्द्रता सरासरी 38.39 टक्के आहे. हवेतील आर्द्रता 80 टक्केच्या पुढे गेल्यानंतर हमखास पावसाची शक्यता असते. हीच आर्द्रता वरील चार महिन्यांत वाढण्याची शक्यता असल्याने समाधानकारक पावसाची शक्यता आहे.

मागीलवर्षी वेळेवर पाऊस न झाल्याने कृषी विभागाने जून महिन्यात लागवड करण्याचा सल्ला दिला होता. याबाबत विचारले असता प्रा. देठे म्हणाले, यंदा तशी परिस्थिती राहणार नसल्याने शेतकरी बांधवांनी वेळेवर कपाशीची लागवड करण्यास हरकत नाही. एकंदरित यंदाचा पावसाळा चांगला राहणार असून सरासरीच्या 93 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज प्रा. देठे यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या 21 वर्षात सर्वात कमी पाऊस 2018 मध्ये 2936 मिमी. झाला. तर सर्वात जास्त पाऊस 2010 साली 20566 मिमी. झाला आहे. वाढत्या तपमानाबाबत प्रा. देठे म्हणाले, बहुतांश नागरिक मोबाईल अ‍ॅपवरून तपमानाचा अंदाज व्यक्त करतात. प्रत्यक्षात मात्र तसे नाही. ज्यावेळी तुमचा मोबाईल 45 तपमान दाखवितो. त्यावेळी हवामान विभागाकडे त्या तपमानाची 43 ची नोंद झालेली असते. त्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा उपलब्ध आहे. 45 तपमान झाले तर वाळलेल्या झाडाच्या फांद्या वार्‍यामुळे एकमेकांना घासून घर्षण होऊन पेट घेऊ शकतात व त्यामुळे वणवा लागू शकतो. यासाठी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता हवामान विभागाशी संपर्क साधावा.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!