Thursday, April 25, 2024
Homeनगरश्रीरामपुरात दुसर्‍या दिवशीही अवकाळी पाऊस

श्रीरामपुरात दुसर्‍या दिवशीही अवकाळी पाऊस

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-

श्रीरामपूर शहर व परिसरात काल गुरूवारी दुसर्‍या दिवशीही अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे श्रीरामपूरकरांची धांदल उडाली.

- Advertisement -

बुधवारी रात्री 8.15 वाजता पावसास सुरूवात झाली होती. ही रिपरिप सुमारे 15 मिनीटे सुरू होती. त्यानंतर गुरूवारीही रात्री 8 वाजता पावसास सुरूवात झाली. सुमारे अर्धातास पावसाच्या सरी कोसळत होत्या. या पावसामुळे आंबा पिकाच्या मोहराला फटका बसणार आहे. तसेच ढगाळ हवामानामुळे किड व अळीचा प्राद्रुुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान रात्री उशिरापर्यंत रिपरिप पाऊस सुरु होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या